सरपंच संतोष देशमुखांचे मारेकरी व या कटाचे सूत्रधार मोकाट असतील तर मराठा स्वस्थ बसणार नाही…१८ डिसेंबर,चलो मस्साजोग*
मराठा युवा सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करणारे मोकाट आहेत.हे क्रौर्य कल्पनेच्या पलीकडचं आहे.या मराठा तरुणाचा देह हालहाल करून छिन्नविछिन्न केला गेला.या जातीय दहशतीला रोखायला हवे.

*सरपंच संतोष देशमुखांचे मारेकरी व या कटाचे सूत्रधार मोकाट असतील तर मराठा स्वस्थ बसणार नाही…१८ डिसेंबर,चलो मस्साजोग*
नेवासा प्रतिनिधी मराठा युवा सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करणारे मोकाट आहेत.हे क्रौर्य कल्पनेच्या पलीकडचं आहे.या मराठा तरुणाचा देह हालहाल करून छिन्नविछिन्न केला गेला.या जातीय दहशतीला रोखायला हवे.
*मस्साजोगची ही घटना कोपर्डीचीच पुनरावृत्ती आहे.*
देशमुख कुटुंबियांना न्याय मिळायला हवा.या घटनेचे गांभीर्य वेळीच ओळखले नाही तर ही हानी कधीच भरून निघणार नाही.अनेक निष्पाप बांधवांचे असेच जीव पुढेही घेतले जातील.म्हणून लढावं लागेल.चला निकराचा लढा देऊ.
*बुधवार,दि.18 डिसें.2024 रोजी स.10वा. कै.सरपंच संतोष देशमुख यांच्या दशक्रिया विधीला मस्साजोग ता.केज येथे उपस्थित राहू आणि या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा एकत्रित संकल्प करु.आम्ही येतोय आपणही यावे.जय शिवराय!*
— संजीव भोर पाटील.