राष्ट्रवादीच्या वतीने अब्दुलभैया शेख यांना उमेदवारी मिळावी म्हणून शिष्टमंडळ अजितदादांना भेटले
एकेकाळी नेवासा तालुक्याचा बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नेवासा विधानसभेची जागा मिळावी व राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुलभैया शेख यांना नेवासा विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी अजित दादा गटाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटले सदरच्या भेटीत पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू स्पष्ट ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रह धरला.
राष्ट्रवादीच्या वतीने अब्दुलभैया शेख यांना उमेदवारी मिळावी म्हणून शिष्टमंडळ अजितदादांना भेटले
नेवासा(प्रतिनिधी)एकेकाळी नेवासा तालुक्याचा बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नेवासा विधानसभेची जागा मिळावी व राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुलभैया शेख यांना नेवासा विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी अजित दादा गटाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटले सदरच्या भेटीत पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू स्पष्ट ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रह धरला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे युवा नेते अब्दुल भैया शेख हे नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील रहिवासी असून पुणे येथे ते हॉटेल व्यवसायात कार्यरत आहे, पुणे येथे देखील अब्दुलभैय्या शेख यांनी अजितदादा पवार यांना खंबीर साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे त्यामुळे अजित दादापुढे त्यांनी मोठी छाप निर्माण केली आहे.
नेवासा तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या अब्दुलभैय्या यांनी नेवासा तालुक्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ विशेष यंत्रणा राबवून दिला आहे, ठिकठिकाणी त्यांनी घेतलेल्या नेवासा तालुक्यातील मेळाव्यांना देखील खेडोपाडयातील बहिणींसह भावांनी देखील त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे
नेवासा तालुक्यात अब्दुलभैय्या शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उभे केलेले कार्य तसेच आरोग्य विषयक दिलेल्या सुविधा व कामगारांसाठी राबविलेल्या योजना याची दखल अजितदादा पवार यांनी घ्यावी व अब्दुलभैय्या शेख यांच्यासाठी नेवासा विधानसभा मतदार संघासाठी ही जागा राष्ट्रवादीसाठी महायुती नेत्यांकडून मागून घ्यावी असे साकडे शिष्टमंडळाने झालेल्या चर्चेप्रसंगी केली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेवासा तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष अभिराज आरगडे,तालुका उपाध्यक्ष संभाजी राजे जाधव,तालुका कार्याध्यक्ष अभय तुवर, कामगार आघाडीचे नेते मकरंद राजहंस यांचा समावेश होता.