पिक विमा वंचित शेतकर्यांतर्फे *अॅड अजितदादा काळे यांचा सत्कार*
नेवासे तालुक्यातील पिक विमा वंचित लाभार्थी शेतकर्यांतर्फे नुकताच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड अजितदादा काळे यांच्या हस्ते नेवासे येथील चौकातील प्रथम श्रीगणेशांचे पूजन करून नंतर सत्कार करण्यात आला .
नेवासे तालुक्यातील पिक विमा वंचित लाभार्थी शेतकर्यांतर्फे नुकताच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड अजितदादा काळे यांच्या हस्ते नेवासे येथील चौकातील प्रथम श्रीगणेशांचे पूजन करून नंतर सत्कार करण्यात आला . पिक विमा वंचित शेतकर्यांतर्फे
*अॅड अजितदादा काळे यांचा सत्कार*
नेवासा – नेवासे तालुक्यातील पिक विमा वंचित लाभार्थी शेतकर्यांतर्फे नुकताच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड अजितदादा काळे यांच्या हस्ते नेवासे येथील चौकातील प्रथम श्रीगणेशांचे पूजन करून नंतर सत्कार करण्यात आला .
2022/23 चं सुमारे 42 लाख रुपयांचा बाऊन्स चेक शेतकरी संघटनेच्या वतीने सुमारे 443 शेतकऱ्यांना मिळवून देण्यात यश आले . यामध्ये महत्वाची भुमिका बजाविणारे श्री अजित तुवर यांचा देखील सत्कार करण्यात आला .
यावेळी अॅड अजितदादा काळे यांनी नेवासे तालुक्यातील पिक विमा हि केवळ सुरुवात आहे . परंतु पुढील भुमिका शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी मोठे संघटन करणार असल्याचे सांगितले . तसेच 2023/2024 च्या ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी कडून विमा रक्कम शेतकऱ्याच्या हातात आणण्याकरीता गंभीर भुमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले . त्याकरीता पुढील आठवड्यात कागदपत्रांसह कायदेशीर बाबींचा अभ्यास करून जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालय गाठणार असल्याचे त्यांनी सांगितले . अकारी पिडीत शेतकरी , दुग्ध उत्पादक शेतकरी यांच्या यशस्वी आंदोलनानतर आता विमा धारक शेतकऱ्यांच्या आशा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पल्लवित झाल्या आहेत .
शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका युवाध्यक्ष डॉ रोहीत कुलकर्णी यांनी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढा द्यावा असे आवाहन केले .
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिअप्पा तुवर , तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे , उपाध्यक्ष बाबासाहेब नागोंडे , नरेंद्र पा . काळे , किरणदादा लंघे, विश्वासराव मते , श्री प्रकाश जाधव , श्री साहेबराव पवार , श्री कैलास पवार , श्री दत्तात्रय निकम , श्री कमलेश दादा नवले , भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे, सोमनाथ आवटी, संजय ठुबे, सोमनाथ लंघे ‘ तान्हाजी पोटे ‘ सोमनाथ नाबदे
गिडेगाव शाखाध्यक्ष – आनिल सांळुके आदिंसह शेतकरी वर्ग उपस्थित होता .