कुंभार समाजातील ४० कारागिरांना इलेक्ट्रिक चाक वाटप!
आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून माती कलेला नवे रूप आणण्याचा प्रयत्न - आप्पा जोर्वेकर

कुंभार समाजातील ४० कारागिरांना इलेक्ट्रिक चाक वाटप!
आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून माती कलेला नवे रूप आणण्याचा प्रयत्न – आप्पा जोर्वेक
नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील कुंभार समाजातील ४० कारागिरांसाठी खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई यांच्यावतीने समाज विकास संस्थेमार्फत नेवासा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मातीकला कार्यक्रम प्रशिक्षण समारंभात लघुउद्योग संस्था नवीदिल्लीचे अध्यक्ष मनोज कुमार यांच्या हस्ते तालुक्यातील ४० कारागिरांना प्रायोगिक तत्वावर चाक वाटप करून कारागिरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.भाऊसाहेब आवांडकर,
जिल्हा महासचिव प्रा.विलासराव तुळे,अहिल्यानगर उत्तर अध्यक्ष भगवानराव जगदाळे पश्चिम
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल झोजे,कार्यकारी अध्यक्ष विष्णू शिर्के,राज्य संघटक शिवाजीराव महाशिकारे, जिल्हा उपाध्यक्ष,पांडुरंग साळुंके कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष आप्पा जोर्वेकर,जेष्ठे नेते डॉ.लक्ष्मण खंडाळे सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आप्पा जोर्वेकर म्हणाले,की,आज आपण अथक प्रयत्नातून ही इलेक्ट्रिक साहित्य आपल्या कारागिरांना देवून प्रत्येकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून माती कलेला नवे रूप आणण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनाचे सोने करुन कुंभार समाजाने आपल्या व्यावसायात मोठी गरुड झेप घ्यावी असे यावेळी बोलतांना ते म्हणाले.डॉ. लक्ष्मण खंडाळे म्हणाले,की कुंभार समाज हा कष्टकरी आहे, मातीतून आपले जीवन फुलवित असतो आयुष्यात प्रत्येकाने प्रत्येक क्षण मनापासून जगावा स्वतःतील गुणांचा जीवनात अधिक विकास करीत आयुष्य यशस्वी करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी योगेश राऊत,राजेंद्र बोरुडे, नितीन घोडके,संतोष म्हाञे,परिश्रम घेतले तर केंद्रिय लोकशाही पञकार संघाचे राष्ट्रिय अध्यक्ष राजेंद्र दळवी व तालुकाध्यक्ष योगेश राऊत यांनी आभार व्यक्त केले.