तूर व कापूस हमीभाव केंद्र त्वरीत चालू करावेत* *शेतकरी संघटना*
नेवासा तालुक्यामध्ये त्वरित तुर व कापूस हमीभाव केंद्रे चालू करावेत अशी मागणी नेवासा तालुका शेतकरी संघटनेने तहसीलदार ,कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कृषी अधिकारी यांचेकडे केलेली आहे

*तूर व कापूस हमीभाव केंद्र त्वरीत चालू करावेत*
*शेतकरी संघटना*
नेवासा – नेवासा तालुक्यामध्ये त्वरित तुर व कापूस हमीभाव केंद्रे चालू करावेत अशी मागणी नेवासा तालुका शेतकरी संघटनेने तहसीलदार ,कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कृषी अधिकारी यांचेकडे केलेली आहे .शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस पडून आहे .त्याचप्रमाणे तूर देखील तयार होऊन शेतकऱ्यांच्या अंगणात वाळत आहे .परंतु दोन्ही मालाला हमीभावापेक्षा देखील खूप कमी किंमतीमध्ये व्यापारी खरेदी करत आहेत .तुरीचा भाव केवळ सहा हजार रुपये क्विंटल या दराने व्यापारी खरेदी करत आहेत .यामध्ये अनेक व्यापार्यांकडून शेतकऱ्यांची तुरीच्या प्रतवारी चे निमित्त करून फसवणूक केली जात आहे .ज्या वस्तूंच्या आधारभूत किमती शासन नियमित करते त्या सर्व आवश्यक वस्तू हमीभावाने विकत घेणे ही शासनाची जबाबदारी असते .परंतु शेतकऱ्यांना आर्थिक गरज असल्याकारणाने आणि हमीभाव केंद्रे शासनाची उघडी नसल्याने शेतमाल हा व्यापाऱ्यांकडून स्वस्तात विकत घेतला जातो आणि नंतर तोच माल व्यापाऱ्यांकडून गैर कारभार करून शासनास विकला जातो .या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो .त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्वरित तूर व कापूस यांची हमीभावाची खरेदी केंद्रे नेवासा तालुक्यात त्वरित चालू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे यांनी केलेली आहे .
त्याचप्रमाणे सोयाबीन हमीभाव केंद्रात क्विंटल मागे शंभर रुपये टप करणे या नावाखाली काढले जातात तर अनेक वेळा शेतकऱ्यांकडून दोनशे रुपये क्विंटल मागे घेतल्याच्या तक्रारी आल्या असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष हरीअप्पा तुवर यांनी सांगितले . त्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे समजते .
या व्यतिरिक्त युरिया सारख्या खतांबरोबर इतर खतांची लिंकिंग असल्याचे शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष डॉ रोहित कुलकर्णी यांनी निदर्शनास आणून दिले .सदर लिंकिंग ही बेकायदेशीर असून त्याची नोंद शेतकरी संघटनेने घेतलेली आहे .
वरील सर्व मागण्या करता नेवासा तालुका शेतकरी संघटना ही*तूर व कापूस हमीभाव केंद्र त्वरीत चालू करावेत*
यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते जिल्हा उपाध्यक्ष हरीअप्पा तु वर तालुकाध्यक्ष अशोक मेजर काळे उपाध्यक्ष बाबासाहेब नागवडे जेष्ठ नेते दत्तू पाटील निकम किरण लंघे विश्वास मते भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे श्री कावळे भाऊसाहेब कायदेशीर सल्लागार सोमनाथ औवटी ,सागर लांडे, दादासाहेब नागदे शेतकरी युवा नेते, सुधाकर देशमुख, बापूसाहेब देशमुख तालुका युवा शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष डॉक्टर रोहित कुलकर्णी, गणेश कंक अनेक शेतकरी उपस्थित होते