27 साखर कारखान्यांपैकी फक्त 7 साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला
चार हजार पुढे प्रतिटन पेक्षा कमी दर दिल्यास कारखान्यावर चक्का जाम आंदोलन

27 साखर कारखान्यांपैकी फक्त 7 साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला
नेवासा प्रतिनिधि 4000 हजार प्रतिटन पेक्षा कमी दर दिल्यास कारखान्यावर चक्का जाम आंदोलन
शेतकऱ्यांच्या हातात साखर कारखान्याचे ऊसदर हमीपत्र दिल्याशिवाय ऊस तोडू नका : तालुका अध्यक्ष मेजर काळे
अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी प्रतिनिधी,संघटना सोडले तर एकही नेता आमदार खासदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करायला तयार नाही : अजित काळे साहेब शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष
जिल्ह्यात ऊस दर निश्चिती म्हणजे साखर कारखानदारांची संघटित गुन्हेगारी : अशोक काळे मेजर
आज दिनांक 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी,आरजेडी, पोलीस,कृषी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी, साखर कारखानदार यांच्या उपस्थितीत ऊस दर बैठक झाली बैठकीत एकूण सहकारी व खाजगी 27 साखर कारखा न्यांपैकी फक्त 7 साखर कारखानदारांनी भाव जाहीर केले सगळ्यांचे भाव 4000 हजाराच्या ऊस दर पाहिजे सर्व उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी बैठकी मध्येच ऊस दर मिळत नसल्याने चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शेतकरी प्रतिनिधी अभिजीत पोटे यांनी ऊसतोड कामगार सरसकट उसाचे पाचरट जाळल्या शिवाय ऊस तोडत नाहीत पाचरट पेटवल्याने ऊसातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने वजन कमी भरत आहे यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते ऊस तोडायला आलेले मजूर आणि हार्वेस्टर मालक प्रति एकर सहा हजार रुपये शेतकऱ्यांकडून घेतल्याशिवाय ऊस तोडत नाहीत शेतकरी आपल्या दारात आलेल्या ऊसतोड कामगारांना हार्वेस्टर चालक ट्रक ट्रॅक्टर चालक यांना निवारा चहा पाणी आणि जेवणाची व्यवस्था स्वतःहून करत असतो हे करून सुद्धा शेतकऱ्याला पैशांसाठी लुबाडले जात असल्याचे जिल्हाधिकारी आणि आरजेडी यांच्या लक्षात आणून दिले तसेच वजन मापन अधिकारी यांनीच प्रमाणीत केलेल्या खाजगी काट्यावर वजन काटा मालक उसाच्या गाडीचे वजन करत नाही किंवा त्या वजन काट्यावर उसाची वजन झालेली गाडी साखर कारखान्यात खाली करून घेतली जात नाही त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या मालाचे वजन तपासण्यात अडचण निर्माण होत आहे याच संधीचा फायदा घेऊन साखर कारखानदार उसाच्या वजनात मोठा काटा मारून शेतकऱ्याला फसवत आहेत वजन मापन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी समिती नेमावी व त्यामध्ये प्रत्येकी दोन शेतकरी प्रतिनिधी यांना समितीचे सदस्यत्व देऊन काटा तपासणीसाठी सोबत घ्यावे अशी मागणी केली लवकरच शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करी जर चार हजार प्लस चा भाव जर दिला नाही तर असे अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधी आपली भूमिका मांडली
दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा दुसऱ्या तालुक्यातील साखर कारखाने आपले कार्यक्षेत्र सोडून दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रातला ऊस तोडून आणतात व ऊस तोड करताना जास्तीचा भाव तोंडी सांगतात प्रत्यक्षात कारखान्याला ऊस जाऊन सात-आठ महिने झाल्यानंतर उसाचे पेमेंट मागण्यासाठी जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यावर जातो त्यावेळेस त्याला कार्यक्षेत्राच्या बाहेरील ऊस असल्याने जवळपास पाचशे ते सातशे रुपये टनाला पैसे कमी देऊन फसवतात अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस दर निश्चितीचे साखर कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळाचे स्वाक्षरी असणारे ऊस दर हमीपत्र शेतकऱ्यांच्या हातात दिल्याशिवाय ऊसतोड होऊ देऊ नका असे आव्हान जिल्हाधिकारी आणि आरजेडी यांना तालुका अध्यक्ष शेतकरी संघटनेच्या अशोक काळे यांनी केले युग
हंगाम सुरू होऊन दोन महिने होऊन गेले अद्याप फक्त दोन महिने गाळप हंगाम बाकी आहे एकूण 27 साखर कारखान्यापैकी फक्त 7 साखर कारखान्यांनी उसाचे दर तोंडी जिल्हाधिकारी आणि आरजेडी यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत जाहीर केले आहेत त्याबाबतीत कुठलेही खुलासा पत्र अथवा हमीपत्र जाहीर झालेले नसून सर्व साखर कारखान्यांचे ऊस दर निश्चितीचे हमीपत्र कधी जाहीर करणार असा भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे तालुका संघटक शेतकरी संघटना व अभिजीत पोटे यांनी सवाल विचारला असता जिल्हाधिकारी आणि आरजेडी यांनी उपस्थित साखर कारखानदारांना डिसेंबर अखेरपर्यंत ऊस दर जाहीर करण्याची नोटीस दिली आहे
उपस्थित असणाऱ्या विविध संघटनांचे शेतकरी प्रतिनिधी यांनी डिसेंबर अखेरपर्यंत साखर कारखानदारांनी एफ आर पी आणि बाय प्रॉडक्ट मध्ये मोठी फेरफार करून रिकवरी चोरली आहे जर उसाला प्रति टन जिल्ह्यात तीन हजारापेक्षा कमी भाव दिल्यास संबंधित कारखान्यावर चक्काजाम आंदोलन करून उसाचे एक टिपरूही कारखान्यात जाऊ देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली याप्रसंगी शेतकरी संघटनेचे दत्तू पाटील निकम तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागवडे श्री गणेश कंक, तितकरी संघटनेची कायदेशीर सल्लागार अडवोकेट भाऊसाहेब कावळे शेतकरी संघटनेचे अशोक काळे मेजर, शेतकरी प्रतिनिधी दादाा नाबदे नानासाहेब पवार, दीपक पटारे,नानासाहेब तागड, रमेश भालके, सोमनाथ गर्जे, कृष्णा सातपुते, संजय वाघ, मेजर महादेव आव्हाड हे शेतकरी प्रतिनिधी व सर्व साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि शेतकी विभागाचे अधिकारी उपस्थित होते