भानसहिवरा परिसरातील नागरिकांचा नियमित सिंगल फेज साठी “आत्मदहन आंदोलनाचा “इशारा…….
भानसहिवरे येथील वाडया वस्तीवर रहाणाऱ्या नागरिकांना गावठाण प्रमाने अक्षय प्रकाश योजना त्वरित सुरू न केल्यास नागरिकांच्या वतीने सामुदायिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेवासा तालुका सरचिटणीस
भानसहिवरा परिसरातील नागरिकांचा नियमित सिंगल फेज साठी “आत्मदहन आंदोलनाचा “इशारा…….
नेवासा (प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील वाडया वस्तीवर रहाणाऱ्या नागरिकांना गावठाण प्रमाने अक्षय प्रकाश योजना त्वरित सुरू न केल्यास नागरिकांच्या वतीने सामुदायिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेवासा तालुका सरचिटणीस तथा जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.या संदर्भात आज लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार, उपकार्यकारी अभियंता महावितरण यांना आत्मदहन
आंदोलना संदर्भात निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, वाड्या वस्तीवर रहाणाऱ्या नागरिक, विद्यार्थी यांना विजे अभावी अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी आहे.अनेक निवेदने दिली आहेत तरी पण अद्याप कोणतीही दखल घेतली नाही.आता नागरिकांच्या सहन शिलतेचा अंत झाला असून दिनांक ६ आक्टोबर हे२०२४पर्यत योजना सुरू न झाल्यास सोमवार दिनांक ७ आक्टोबर रोजी भानसहिवरे ता.नेवासा येथील बाजार तळावर नागरिकांच्या वतीने सामुदायिक आत्मदहन करणार आहे.असा इशारा भाजपचे तालुका सरचिटणीस लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांनी नागरिकांच्या वतीने प्रशासनाला दिला आहे.दिला आहे.या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, बाळासाहेब क्षिरसागर,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे तालुका उपाध्यक्ष मानव साळवे, देविदास पटारे, चांगदेव दारूंटे, संभाजी भणगे, गणेश टाके,शाहुल मकासरे, शशिकांत बेहळे, फिलीप मकासरे, डोईफोडे यांचेसह शेतकरी नागरिक उपस्थित होते. लक्ष्मणराव मोहिटे यांना शेतकरी संघटनेच्या पाठिंबा या मागणीसाठी लवकरच शेतकरी संघटना यात लक्ष घालणार शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख तालुका अध्यक्ष अशोक मेजर काळे यांनी दूरध्वनी क्रमांक वर फोन करू पाठिंबा दिला.