Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी उत्पन्न बाजार समितीकृषी कायदाकृषीवार्तागुन्हेगारीजिल्हाधिकारीतहसीलपंचनामाब्रेकिंगशेतकरी विरोधी कायदेश्रीरामपूर

बाजार समितीतील गैरव्यवहारांची चौकशी करा – निलेश शेडगे

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावरच संचालकांनी अविश्वास दाखविला असून, सभापती आणि प्रभारी सचिवांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे यांनी केला आहे. या भ्रष्टाचारातून जमविलेल्या पैशांतून बेलापूर येथे मोठ्या रिसॉर्टचे काम सुरू आहे, असा गंभीर दावा त्यांनी केला असून, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

0 2 2 2 3 3

बाजार समितीतील गैरव्यवहारांची चौकशी करा – निलेश शेडगे

 

श्रीरामपूर : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावरच संचालकांनी अविश्वास दाखविला असून, सभापती आणि प्रभारी सचिवांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे यांनी केला आहे. या भ्रष्टाचारातून जमविलेल्या पैशांतून बेलापूर येथे मोठ्या रिसॉर्टचे काम सुरू आहे, असा गंभीर दावा त्यांनी केला असून, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

सभापती आणि प्रभारी सचिवांवर गंभीर आरोप

 

शेडगे यांनी स्पष्ट केले की, बाजार समितीला खाजगी मालमत्ता असल्यागत लुटले जात आहे. संचालकांनीच कारभारावर अविश्वास दर्शविल्याने आपण काही दिवसांपूर्वी केलेले आरोप खरे ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

भ्रष्टाचाराची ठळक प्रकरणे:

निवृत्तीनाथ पालखीच्या वर्गणीत हिशोबाचा अभाव.

संस्थेच्या पेट्रोल पंपावरील आर्थिक गैरव्यवहार.

व्यापाऱ्यांना लायसन्स देताना लाचखोरी.

मार्केट सेसचे सेकंड रजिस्टर बेकायदेशीरपणे ठेवून पैशांची अफरातफर.

शेडगे यांच्या मते, सभापती आणि प्रभारी सचिवांनी मिळून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठी संपत्ती जमवली आहे, आणि बेलापूर येथे सुरू असलेल्या रिसॉर्टच्या कामाचा पैसा कुठून आला? याची आयकर विभाग आणि ईडीमार्फत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

“शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांची लूट खपवून घेतली जाणार नाही!”

श्रीरामपूर बाजार समिती शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिली आहे. मात्र, सध्याच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचे पैसे लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे.

स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेची पुढील भूमिका:

सहायक निबंधक आणि जिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल.

संपूर्ण भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी.

प्रभारी सचिवांना तत्काळ निलंबित करण्याचा आग्रह.

 

भ्रष्ट व्यवस्थापनाला थांबवण्यासाठी लढा उभारू!

 

“बाजार समितीतील भ्रष्टांचा बाजार उठविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम इशारा निलेश शेडगे यांनी दिला आहे.

निलेश शेडगे

जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष

शे

तकरी संघटना, अहिल्यानगर

मो. ९२७०१६२४३६

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे