Breaking
अहमदनगरई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषीवार्ताजिल्हा परिषद अहिल्यानगरजिल्हा सहकारी बँक अहमदनगरतहसीलतहसीलदार नेवासानिवडणूकनेवासा तालुकाब्रेकिंगमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईमुंबई उच्च न्यायालयराजकियशेतकरी आंदोलनशेतकरी संघटना नेवासाशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यशेतकरी संघटना श्रीरामपूरहमीभाव

शेतकरी संघटनेच्या विजयात सचिन नागवडे यांचा मोलाचा वाटा* 

शेतकरी संघटनेने दिघी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बहुमताने जिंकली असून, या यशामध्ये सचिन नागवडे यांचा मोलाचा वाटा आहे. ९ मताने विजय झाले तर समोरचे विरोधकाला ४ मते मिळाली. म्हणजेच बहुमताने निवड झाली.

0 2 2 2 3 3

*शेतकरी संघटनेच्या विजयात सचिन नागवडे यांचा मोलाचा वाटा* 

 

*दिघी (ता. नेवासा) -* शेतकरी संघटनेने दिघी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बहुमताने जिंकली असून, या यशामध्ये सचिन नागवडे यांचा मोलाचा वाटा आहे. ९ मताने विजय झाले तर समोरचे विरोधकाला ४ मते मिळाली. म्हणजेच बहुमताने निवड झाली.

 

*सचिन नागवडे हे एक कुशल सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे तालुका प्रतिनिधी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. संघटनात्मक कौशल्य आणि तरुणांना सोबत घेत गावाचा विकास करण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे.* शेतकरी संघटनेच्या प्रसिद्धीसाठी ते नेहमी सहकार्य करतात व संघटनेच्या विविध उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देतात *. या निवडीचे वैशिष्ट्य तालुक्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांना हुलकावणी देत शेतकरी संघटनेने आपला झेंडा फडकवला.* संचालकाच्या बहुमताने निवड प्रक्रिया पार पडली. प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे साहेब यांनी अभिनंदन केले मार्गदर्शन लाभले 

 

या निवडीची वार्ता कळताच **शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष हरी आप्पा तूवर, व जेष्ठ मार्गदर्शक दत्तू पाटील निकम* तालुका अध्यक्ष अशोक मेजर काळे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागवाडे,शेतकरी व आघाडीचे तालुका अध्यक्ष रोहित कुलकर्णी, संपर्कप्रमुख विश्वास मते, कायदेशीर सल्लागार भाऊसाहेब कांवळे, तालुका संघटक भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

 

शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील काळे, युवा नेते दादासाहेब नाबदे अशोक नागवडे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप आणि बापूसाहेब देशमुख यांनीही त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

या विजयामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भविष्यात संघटनेच्या नेतृत्वाखाली अधिक व्यापक विकासकार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.*निवडणूक अधिकारी वने साहेब व सहाय्यक निबंध घोडेचोर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे