टेनिस स्पर्धेत प्रणव कोरडेला दुहेरीत विजेतेपद*
आज दिनांक 20/12/ 2024 रोजी तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या *अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत आयटा वन लाख टूर्नामेंट* छत्रपती संभाजीनगरचा प्रतिभावान खेळाडू प्रणव कोरडे याने नैसिक रेड्डी याच्या साथीने दुहेरीत विजेतेपद पटकावले.

*टेनिस स्पर्धेत प्रणव कोरडेला दुहेरीत विजेतेपद*
संभाजीनगर प्रतिनिधी आज दिनांक 20/12/ 2024 रोजी तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या *अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत आयटा वन लाख टूर्नामेंट* छत्रपती संभाजीनगरचा प्रतिभावान खेळाडू प्रणव कोरडे याने नैसिक रेड्डी याच्या साथीने दुहेरीत विजेतेपद पटकावले.
प्रणव कोरडे व नैसिक रेड्डी या अव्वल मानांकित जोडीने या ज्वेल डी एलनक्रिस्ट आणि बालाजी मनीष या तामिळनाडूच्या जोडीला 6-3,6-1 नमवत उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच या जोडीने अतिशय उच्च दर्जाचा खेळ करून स्पर्धेमध्ये सणसनाटी निर्माण केली.
त्यानंतर प्रणव व नैसिक रेड्डी या जोडीने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित संदेश कुमार रिसीवर्धन आणि विनीत मुथालां यांच्यावर 3-6 7-6(4), 11-9 अशी मात केली.
अंतिम सामन्यात या जोडीने निश्चित राहणे आणि अनिश रांजळकर यांना सरळ सेटमध्ये पराभूत करून अंतिम सामना 6-3, 6-4 असा जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विजेतेपद पटकावणाऱ्या प्रणव कोरडे हा एक प्रतिभावान खेळाडू आहे याला प्रशिक्षक गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
सध्या प्रणव कोरडे हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करण्याच्या हेतूने बंगलोर येथील पीबीआय टेनिस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे.
या कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगरच्या माननीय आमदार प्रदीपजी जयस्वाल छत्रपती संभाजीनगर आणि माननीय आमदार संजना जाधव कन्नड विधानसभा, अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत अदवंत व सीनियर कौन्सिल संजीवजी देशपांडे, मुख्य सरकारी वकील मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औंगाबाद विधीतज्ञ अजित काळे साहेब शेतकरी संघटनेेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अमरजीत गिरासे यांनी प्रणव ज्ञानेश्वर कोरडे याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.