दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणावर मूळ जमीन दात्या डॉ. नयना सोनवणे-खिलारे यांची संतप्त प्रतिक्रिया
दान केलं, पण पश्चाताप पदरी पडला!"

“दान केलं, पण पश्चाताप पदरी पडला!”
दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणावर मूळ जमीनदात्या डॉ. नयना सोनवणे-खिलारे यांची संतप्त प्रतिक्रिय
पुणे | प्रतिनिधी
गेले दोन दिवस पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरलेलं दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण, या हॉस्पिटलसाठी ६ एकर जमीन जागा विनामोबदला दान करणाऱ्या खिलारे कुटुंबाच्या दुःखद आणि संतप्त प्रतिक्रिया आता उघडपणे समोर येत आहेत.
“पुन्हा इतिहासात जावं लागतंय… आणि विचार सतावतोय – तो निर्णय चुकला होता का?”
अशा भावना व्यक्त करत डाॅ. नयना सोनवणे-खिलारे यांनी संपूर्ण प्रकरणाचे तपशीलवार वर्णन केलं आहे. त्या सांगतात की, त्यांच्या लहानपणाच्या आठवणी, आई-वडील, आजी-आजोबा, संपूर्ण कुटुंबाची भावना त्या जागेशी जोडलेली होती. तरीही, धर्मादाय हॉस्पिटल उभं राहील, गोरगरीबांची सेवा होईल या उद्देशाने ती जागा लता मंगेशकरांच्या विनंतीवरून शरद पवारांच्या माध्यमातून विनामोबदला दिली गेली.
“त्या वेळी एकही फरशीवर आमचं नाव लावलं नाही, पण एवढीच अपेक्षा होती की गोरगरीब रुग्णांना ३०% सवलत मिळावी,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
परंतु आज परिस्थिती उलट झाली आहे. त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारलं जातं, आणि पैशाअभावी उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. “ही परिस्थिती आमच्यासारख्या दात्यांसाठी वेदनादायक आहे,” असं डॉ. खिलारे नमूद करतात.
त्यांनी आणखी एक धक्कादायक बाब उघड केली – माजी महापौर दि.ज. खिलारे यांच्या बायपास सर्जरीनंतर हॉस्पिटलने त्यांच्याकडून लाखो रुपयांचं बिल आकारलं आणि डॉक्टर धनंजय केळकर यांनी स्वतःच्या ६०० रुपये व्हिजीट चार्जेसही लावले – जेव्हा ते रुग्णाला भेटायला आले होते!
“पण आम्ही तेही हसत स्वीकारलं… कारण आम्ही आमचं माणूसपण गमावलेलं नाही,” असं सांगून त्यांनी माणुसकीचा खरा अर्थ अधोरेखित केला.
आज मात्र, मूल उद्दिष्ट बाजूला ठेवून हा हॉस्पिटल पैसा कमवण्याचं साधन झालं आहे, धर्मादायतेच्या नावाखाली लूट सुरू आहे, असा थेट आरोप डॉ. खिलारे यांनी केला आहे. त्यामुळे, आज जेव्हा हॉस्पिटलमुळे एखादा बळी जातो, तेव्हा खूप वाईट वाटतं, हे त्यांनी ठामपणे सांगितलं.
“दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आम्ही निषेध करतो, आणि जे काही घडलं त्याचं आम्हाला दुःख आहे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. आमच्या प्रतिनिधींची बातचीत करताना ही माहिती दिली
डॉ. नयना सोनवणे-खिलारे
संपर्क: 8007001111