Breaking
अहमदनगरकृषीवार्तानेवासा तालुकाब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईसहकारी साखर कारखाना

आज माळेवाडी दुमाला, ता. नेवासा येथे स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रथम गळीत हंगामाच्या शुभारंभ

आज माळेवाडी दुमाला, ता. नेवासा येथे स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रथम गळीत हंगामाच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्याचा सन्मान लाभला. प.पु. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, ह.भ.प. स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज आणि तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे महाराज यांच्या शुभाशीर्वादाने हा सोहळा अधिक मंगलमय झाला.

0 2 2 1 9 0

नेवासा प्रतिनिधी आज माळेवाडी दुमाला, ता. नेवासा येथे स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रथम गळीत हंगामाच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्याचा सन्मान लाभला. प.पु. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, ह.भ.प. स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज आणि तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे महाराज यांच्या शुभाशीर्वादाने हा सोहळा अधिक मंगलमय झाला.

मा.ना.श्री. दादा भुसे साहेब यांच्या शुभहस्ते गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण क्षणी मा.ना.श्री. विजयबापू शिवतारे (चेअरमन), डॉ. ममताताई शिवतारे-लांडे (कार्यकारी संचालक), आणि श्री. विनस विजयबापू शिवतारे (संचालक) यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने ही परंपरा पुढे नेण्यात येत आहे.

कार्यक्रमाला मा. श्री.शिवदीप लांडे साहेब (पोलीस महासंचालक, बिहार राज्य)मा,श्री.अब्दुल भैय्या शेख साहेब (राष्ट्रवादी युवा नेते) मा.श्री.काकासाहेब शिंदे (पंचगंगा शुगर संचालक), मा श्री.सचिनभाऊ देसरडा(भाजपा संयोजक), मा श्री अंकुशराव काळे(भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष) मा.श्री.प्रताप चिंधे, मा.श्री.विनोद ढोकणे,मा श्री अमित गडोखे, मा.श्री.अनिल शेठ लोखंडे, मा.श्री.मोहनराव काळोखे साहेब, मा.श्री.सस्ते साहेब आणि श्री. अनिल शेठ लोखंडे (संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे) यांचीही उपस्थिती लाभली.

हा शुभारंभ केवळ एका उद्योगाचा प्रारंभ नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला मिळालेली मान्यता असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. “शेतकऱ्यांच्या प्रगतीचा हा सोहळा त्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे.”

 

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 9 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे