Breaking
अहमदनगरई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनगुन्हेगारीजिल्हाधिकारीदेश-विदेशपंचनामापोलीस स्टेशनब्रेकिंगमुंबईमुंबई उच्च न्यायालयलाच लुचपत आणि भ्रष्टाचारहुकूमशाही

!! मी शेवगावकरचा दणका मोडला बिग बुल भामटा साईनाथ कवडे याचा अहिल्यानगर एल.सी.बी. यांनी मणका !!!*

गुजरात च्या सुरत शहरातुन काल रविवारी सायंकाळी अहिल्यानगर च्या पोलिसांनी घेतले भामट्याला शिताफीने ताब्यात* 

0 2 2 2 3 3

*!!! मी शेवगावकरचा दणका मोडला बिग बुल भामटा साईनाथ कवडे याचा अहिल्यानगर एल.सी.बी. यांनी मणका !!!*

 

*गुजरात च्या सुरत शहरातुन काल रविवारी सायंकाळी अहिल्यानगर च्या पोलिसांनी घेतले भामट्याला शिताफीने ताब्यात*

 

[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755

शेवगाव प्रतिनिधी दिनांक:- 17/03/2025 वार सोमवार या बाबत सविस्तर वृत्त असे की गुंतवणुकदारांस कोटयावधी रूपयाचा गंडा घालणारा आरोपी गुजरात येथून जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई …..

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, यातील फिर्यादी अवधुत विनायक केदार, रा.खंडोबानगर, शेवगाव, ता.शेवगाव यांना साईनाथ कल्याण कवडे, रा.कुरूडगाव ता.शेवगाव याने त्याचे ऍ़सिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास सांगुन गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर दरमहा 12% परतावा देण्याचे आमीष दाखविले.त्यावर फिर्यादी व त्याचे कुटुंबियांतील सदस्यांनी तसेच परिसरातील इतर 5 लोकांनी वेळोवेळी ऍ़सिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीमध्ये 1,61,42,900/-रूपये गुंतविले.आरोपीने गुंतवणुकीच्या रक्कमेचा परतावा न देता तसेच गुंतवणुक केलेली रक्कम न देता आर्थिक फसवणुक करून पळून गेला.याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं 887/2024 बीएनएस कलम 406, 409, 420 सह एमपीआयडी कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मा.पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्थिक फसवणुकीबाबत दाखल गुन्हयांचे समांतर तपास करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संतोष लोढे, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ,फुरकान शेख, प्रशांत राठोड व ज्योती शिंदे अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. आरोपी हा गुन्हा दाखल होण्यापुर्वीच फरार झालेला असून, तो सातत्याने राहण्याचे ठिकाण व मोबाईल बदलत असल्याने तपासामध्ये अडचण येत होती.दिनांक 17/03/2025 रोजी पथक वर नमूद फसवणुकीच्या गुन्हयाचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे निष्पन्न आरोपीचा शोध घेत असता आरोपी हा सुरत, गुजरात राज्यात असल्याची माहिती मिळाली.पथकाने सुरत, गुजरात येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव साईनाथ कल्याण कवडे, वय 28, रा.कुरूडगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.

ताब्यातील आरोपी साईनाथ कल्याण कवडे याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने त्याचे मालकीची महिंद्रा कंपनीची कार किशोर शिवाजी जाधव, रा.तिसगाव, ता.पाथर्डी यास दिल्याची माहिती सांगीतली.पथकाने पंचासमक्ष किशोर शिवाजी जाधव यांनी हजर केलेली 15,00,000/- रू किंमतीची महिंद्रा कार क्रमांक एम.एच.-16-सीवाय-0222 जप्त करण्यात आलेली आहे.ताब्यातील आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत आहे. सदर कारवाई मा.श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व मा.श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

[ ताजा कलम ]

 

*भामटा बिगबुल साईनाथ कवडे त्याचे फरार आरोपी वडील कल्याण कवडे सरपंच आई चंद्रकला कवडे भाऊ महेंद्र कवडे यांचा येत्या बुधवारी अटकपूर्व जामीन ता 19 मार्च रोजी खंडपीठ मध्ये ठेवला आहे त्यावर हा त्याचा हजर होण्याचा डाव आहे का ??? का खरंच कारवाई केली आहे हे फसवणुक झालेल्या हजारो गुतंवणूकदारांना समजेल*

 

*क्रमशः*

 

*भामटा साई कवडे फरार असताना त्याला आतुन मदत करणारे त्याचे चेले चपाटे त्याचा CDR रेकॉर्ड काढल्यावर सगळंच पितळ उघड होईल त्याचा जुना स्टाफ लोकांना त्याच्या सांगण्यावरून दम देणारे त्याचे भाडोत्री गुंड कमिशन एजंट यांची वरात पोलिस स्टेशनच्या दारात निघणार का “खर्जुल्या” तोंडाच्या “साई सरांचे” भाडोत्री चमचे कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत ??? याचा शोध शेवगांव पोलीस घेणार का ???*

 

*अविनाश देशमुख शेवगांव*

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

2.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे