Breaking
उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालदेश-विदेशब्रेकिंगमराठा आरक्षणमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुंबईराजकियशिबिरसंपादकीयसंवाद विधानसभा

२०१९ ते २२ दरम्यानचे मराठा संशोधक विद्यार्थ्याना नोंदणी दिनांका पासुन अधिछात्र वृत्ती द्या*!

प्रस्ताव नियोजन विभागा कडे मंजुरीसाठी - राजेंद्र दाते पाटील 

0 2 2 1 8 5

 

*२०१९ ते २२ दरम्यानचे मराठा संशोधक विद्यार्थ्याना नोंदणी दिनांका पासुन अधिछात्र वृत्ती द्या*!

प्रस्ताव नियोजन विभागा कडे मंजुरीसाठी – राजेंद्र दाते पाटील

प्रस्ताव नियोजन विभागा कडे मंजुरीसाठी – राजेंद्र दाते पाटील 

प्रतिनिधी(मुंबई) वर्ष २०१९ पासुन २०२२ पर्यंतची अधिछात्रवृत्ती विद्यापीठ नोंदणी दिनांका पासून मिळणे बाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे नावे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी निवेदन दिले असता अधीछात्रवृत्ती बाबत निर्देश देत अप्पर मुख्य सचिव नियोजन विभाग यांना पाठवले असल्याचा मेल त्यांना प्राप्त झाला आहे.

प्रस्ताव नियोजन विभागा कडे मंजुरीसाठी – राजेंद्र दाते पाटील

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी एक सविस्तर निवेदनात नमुद केले की, त्यांचें दिनांक ०५-०७-२०२३ या रोजीचे सारथी कार्यालयास प्राप्त निवेदन तथा स्मरणपत्र तथा दिनांक २५-११-२०२२ रोजीचे सारथी कार्यालयाचे पत्र जा.क्र. २६६८ पत्र असो किंवा १४-०२-२०२३ रोजीचे सारथी कार्यालयाचे पत्र जा.क्र. ३१७९ किंवा सारथी फेलोशीप २०२३-२४ /६३१ दि. ३१-०७- २०२३ चचे पत्र असुद्यात त्यात २०१९ ते २०२२ पर्यंतची अधिछात्रवृत्ती विद्यापीठ नोंदणी दिनांका पासून मिळणे बाबत चे निर्देश अप्पर मुख्य सचिव नियोजन विभाग यांना तात्काळ होण्याची त्यांची मागणी होती.

त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या निवेदनात नमुद केले होते की, ‘सारथी संस्थे अंतर्गत’अधिछात्र वृत्ती करिता निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ नोंदणी दिनांक पासून अधिछात्र वृत्ती देण्यात यावी अशी आमची सातत्याने संशोधक विद्यार्थी वर्गासाठी मागणी होत असुन त्यांना प्राप्त पत्रा नुसार सारथी कार्यालयाचे दि. २५-११ -२०२२ या रोजीचे पत्र सारथी कार्यालायचे दिनांक ३१-०७- २०२३ या रोजीचे पत्रा नुसार या उपक्रमातील निवड केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना अवार्ड दिनांका पासून अधि छात्रवृत्ती देण्यात यावी किंवा विद्यापीठ नोंदणी दिनांका पासून अधि छात्रवृत्ती देण्यात यावी असे नमुद होते. सदर बाबत शासना कडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे असे सारथीच्या वतीने नमुद केले होते व शासन स्तरावरून याबाबत निर्देश/सूचना प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) पुणे यांनी जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यालेखी सुचित केले होते त्या अनुषंगाने व्यवस्थापकीय संचालक सारथी यांनी दिनांक ०६ आक्टोबर २०२४ रोजी नव्याने शिफारस अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग यांना केली असुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदेशीत करून वर्ष २०१९ ते २०२२ पर्यंतची अधिछात्रवृत्ती विद्यापीठ नोंदणी दिनांका पासून देणे बाबत जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचें सातत्याने केलेल्या मागणी वरून अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग यांना निर्देश दिले आहेत.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे