Breaking
अहमदनगरउद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षउभाटा पक्षक्रांतिकारी पक्षनिवडणूकब्रेकिंगभारतीय जनता पार्टी पक्षराष्ट्रवादी पक्षसंपादकीयसंवाद विधानसभा

अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची रंगीत तालीम सुरू महाविवा आणि महायुतीतील कोणत्या पक्षाला कोणती जागा? 

अहमदनगर जिल्ह्यातील बारावी विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची रंगीत तालीम सुरू महाविवा आणि महायुतीतील कोणत्या पक्षाला कोणती जागा? 

0 2 2 2 3 3

 

संपादकीय राजकीय घडामोडी चे विश्लेषण वेद विधानसभेचा.. कौल जनतेचा

नेवासा ( संपादकीय वार्ता)अहमदनगर जिल्ह्यातील बारा  विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची रंगीत तालीम सुरू महाविवा आणि महायुतीतील कोणत्या पक्षाला कोणती जागा?

महायुती आणि महा विकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये एकाच जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यामुळे जागावाटप करताना या दोन्ही गटाच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या दोन्ही गटातील घटक पक्षातील पक्ष व्यक्तींना जागा वाटपा वेळी चांगलाच कस करावा लागणार आहे खरे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे अणु वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षाच्या माध्यमातून राज्यातील काही मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्याची आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे. नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील अशी संकेत मिळत आहेत या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच महा विकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील इतरांची पक्षांची इच्छुक उमेदवार आत्तापासून रंगीत तालीम करण्यात व्यस्त असल्या चित्र सध्या संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील याला अपवाद राहिलेला नाही. अहमदनगर जिल्ह्यातील बारावी विधानसभा मतदारसंघासाठी आतापासून विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून रंगीत तालीम सुरू झाली आहे.

 

विशेष म्हणजे महायुती आणि महा विकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये एकच जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यामुळे जागा वाटप करताना या दोन्ही गटाच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे या दोन्ही गटातील घटक जागावाटप वेळी चांगलाच कस लावावा लागणार आहे खरे तर मराठी सेना म्हणजेच मनसे आणि वंचित आघाडी या दोन पक्षाच्या माध्यमातून राज्यातील काही मतदारसंघातून जाहीर करण्यात आली राज्यातील उर्वरित पक्षाने अजून उमेदवारीची नावे जाहीर केली नाही महा विकास आघाडी आणि महायुती आणि मधील घटक पक्षांना साध्य जागा वाटपाच्या जोरावर दार मंथन सुरू आहे मात्र जागा वाटपाच्या आधीच दोन्ही गटातील इच्छुक नेत्यांच्या माध्यमातून विविध मतदार संघात आपला दावा ठोकला जात आहे. अशा परिस्थितीत आता आपण अहमदनगर जिल्ह्यातील बारावी विधानसभा मतदारसंघात महा विकास आघाडी आणि महायुती मधील कोणते नेते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शिर्डी:-हा महाराष्ट्रातील बहुचर्चित विधानसभा मतदारसंघ याचे कारण असे की येथून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार आहेत यावेळी देखील महायुतीकडून ही जागा भाजपाच्या वाट्याला येईल आणि राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ही चुरस

निवडणूक लढवतील असे चित्र आहे. मात्र भाजपा मधील राजेंद्र पिपाडा हे देखील इथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे महा विकास आघाडी मधील काँग्रेस पक्षातील प्रभावती घोगरे यांनी निवडणूक लढण्यात निर्धार केला आहे. घोगरे यांनी यासाठी रंगीत तालीम सुरू केली आहे व यामुळे इथून महा विकास आघाडी कोणाला मजुरी देते ही  युतीकडून पुन्हा एकदा मिळते का हे पाहणे उत्सुकता ठरणार आहे.

कोपरगाव:-माहिती मध्ये समाविष्ट असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे आशुतोष काळे हे इथून आमदार आहेत. महायुतीच्या

फॉर्मुला नुसार येथून ही जागा पुन्हा एकदा अजित पवार गटालाच मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे वेगळी भूमिका घेण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली आहे. यामुळे जर ही जागा अजितदादा यांच्या गटाला मिळाली तर वेग कोणी शरद पवार गटाला जातील आणि तिथून पुन्हा एकदा काळे विरुद्ध कोणी अशी लढत पाहायला मिळू शकते.

राहुरी:-महा विकास आघाडी मधील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्ता तनपुरे ही इथून विद्यमान आमदार आहेत यावेळी देखील ही जागा महा विकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटालाच मिळण्याची शक्यता असून महा विकास आघाडीकडून सुमारे कोणाची जो उमेदवारी घेतली पाहायला मिळत आहे. दुसरीकडे महायुतीकडून या जागेसाठी भाजपा आग्रही असून भाजपमध्ये दोन जागा इच्छुक असे समजत आहे.

अहमदनगर शहर:-येथून अजित पवार गटाचे संग्राम भैया जगताप विद्यमान आमदार आहेत. महायुतीच्या फॉर्मुला नुसार ही जागा अजित पवार गटालाच येणे अपेक्षित आहे. मात्र या जागेसाठी भाजप आणि शिंदे गटाची देखील दावा ठोकला आहे. भाजपा आणि शिंदे गटांनी देखील दावा ठोकला आहे भाजपचे पदाधिकारी ही जागा आपल्याकडेच यायला हवी अशी आग्रही मागणी करत असून असे घडले नाही तर बंडखोरी होईल असा इशारा देत आहे. दुसरीकडे महा विकास आघाडी मधील ही तिन्ही पक्ष या जागेसाठी उत्सुक असे दिसते यामुळे आमदार संग्राम भैया जगताप यांना महा विकास आघाडी कडून मिळेल का आणि महा विकास आघाडी कडून कोणत्या पक्ष उमेदवार उभे राहील हे पाणी उत्सवाचे राहणार आहे.

नेवासा:-ठाकरे गटाचे शंकरराव गडाख हे देखील विद्यमान आमदार आहेत मात्र महा विकास आघाडीतील इतर दोन पक्षांनी कोणीही यातून निवडणूक लढण्यास उत्सुक नसल्याचे सध्याचे चित्र आहे. महा युती

बाबत बोलायचं झालं तर येथून भाजपचे दोन जण उत्सुक आहेत. माहिती मधील उर्वरित दोन पक्षाकडून सध्या तरी या जागेसाठी दावा करत आलेला नाही म्हणून इथून महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार गडाख यांचे विरोधात कोण उभे राहणार हे पाहण्यासारखे ठरेल. तसेच नेवासा मध्ये दुसऱ्यांदा आमदारकीची संधी मिळत नाही हा पूर्व इतिहास आहे. जनतेमध्ये सध्या प्रचंड नाराजी असून त्याचा फटका कोणाला बसू शकतो हे येणाऱ्या काळात पहावे लागणार आहे. विशेषता शेतकरी वर्ग जास्त नाराज आहे.

संगमनेर:-अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक हाय प्रोफाईल विधानसभा मतदारसंघ म्हणून संगमनेर ची ओळख. हा विधानसभा मतदारसंघ हाय प्रोफाईल म्हणण्याचे कारण म्हणजे बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात येथील विद्यमान आमदार आहेत बाळासाहेब थोरात येथील विद्यमान आमदार असल्याने महा विकास आघाडी कडून इतर कोणी या जागेसाठी उत्सुक नसेल दिसते. दुसरीकडे महायुतीकडून माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर सुजय विखे  पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. त्यांनी स्वतः इथून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्यांचे पिताश्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय विखे यांच्या उमेदवारीला सपोर्ट केला आहे. महत्त्वाचे म्हणजे महायुतीमध्ये जो थोरात यांच्याशी टक्कर घेणारा दुसरा कोणी नेता या जागेवरून दिसत नाही. यामुळे या जागेवरून महायुतीकडून सुजय विखे पाटील आणि महा विकास आघाडी कडून थोरात यांच्या काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झालेले आणि त्या पराभवाचे बाळासाहेब थोरात यांच्या देखील मोठा सिंहाचा वाटा होता. जर्मन याचा पराभवाचा वाचपा काढण्यासाठी सुजय दादा इथून निवडणूक लढणार लढवतील अशी चित्र आहे.

पारनेर:-नगर दक्षिणचे विद्यमान खासदार हे गेल्यावेळी इथून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र खासदारकीची निवडणूक लढण्यासाठी त्यांनी आमदारकीच्या राजीनामा दिला होता. सध्याचे नगर दक्षिणचे खासदार असून या जागेवर त्यांची पत्नी रजनी ताई लंके निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत.दुसरीकडे शरद पवार काटा कडून आणखी एकाने या जागेसाठी उमेदवारी मागितली आहे महा विकास आघाडी कडून ही जागा शरद पवार गटाला जाण्याची शक्यता असल्याने येथून सौ राणी लंके ही दुसरे कोणी उभे रहात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दुसरीकडे महायुती मधून ही जागा भाजपाच्या वाट्याला येऊ शकते अशी दिसते. अजित पवार गट आणि शिंदे गट या जागेसाठी उत्सुक नाहीयेत. यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघ यावेळी भाजप युद्ध शरद पवार गटाशी लढत होणार आहे. तथापि उमेदवार कोण राहणार की आगामी काळात समजदार आहे.

श्रीगोंदा:-भारतीय जनता पक्षाची बबनराव पाचपुते ही येथून विद्यमान आमदार आहेत. यांच्याकडेच ही जागा येण्याची शक्यता आहे. मात्र या जागी राज्याच्या गटाची दावा दाखल ठोकला आहे म्हणून महायुतीकडून ही जागा भाजपला सुटणार की अजितदादा गटा सरशी करणार हे पाहण्यासारखे ठरेल

महा विकास आघाडी बाबत बोलायचं झालं तरी इथून ठाकरे गटाची आणि शरद पवार गटांनी दावा सांगितलेला आहे.

कर्जत जामखेड;-गेल्या वेळी राम शिंदे यांनी पराभवाची धूळ चारत इथून शरद पवार गटातील रोहित पवार यांनी विजय पताका फडकवली होती. यावेळी सुद्धा ही जागा शरद पवार गटाला जाईल आणि इथून पुन्हा एकदा रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. शरद पवार हे यांची नातू रोहित पवार महा विकास आघाडीचे येथील संभाव्य उमेदवार असून महा विकास आघाडी मधील इतर घटक पक्षाकडून या जागर कोणता दावा करण्यात आलेला नाही. माहिती बाबत बोलायचं झालं तर भाजपाचे राम शिंदे हे गेल्या निवडणुकी होती आणि यंदाही तेच उभे राहतील अशी दिसते कारण ही महायुतीच्या इतर पक्षाकडून या जागेसाठी कोणताच दवाखान्यात आलेला नाही.

श्रीरामपूर:-श्रामपूर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेस पक्षाची लहु कानडी यांनी विजयी पताका फडकवत विधिमंडळ स्थान पाक केली आहे. दरम्याने यंदाही जागा महायु ती विकास आघाडी कडून काँग्रेसलाच मिळण्याची संकेत मिळत आहे. मात्र काँग्रेसकडून आणखी एकाने या जागेसाठी उमेदवारी मागितली आहे. म्हणून महा विकास आघाडी कडून कानडे यांची कोणी दुसरी उभी करणार का राहणार हे पाणी उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे माहिती इथून या जागेसाठी शिंदे गटाचे इच्छा व्यक्त केली आहे.

अकोले:+-अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहान माटे हे इथून विद्यमान आमदार आहेत. यामुळे ही जागा अजित पवार गटाला मिळण्या अपक्षित आहे. मात्र भारतीय जनता पक्ष देखील या जागेसाठी उत्सुक आहेत. शिंदे गट मात्र या जागेसाठी उत्सुक नाही

यामुळे ही जागा महायुतीकडून कोणाला सुटणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल पण अजित गटासाठी सुटली तर पुन्हा एकदा किरण लाहमटे येऊन मजुरी करतील अशी शक्यता आहे.दुसरीकडे महा विकास आघाडीकडून या जागेवर शरद पवार गटाचा उमेदवार उभा करणार राहण्याची शक्यता आहे मात्र शरद पवार गटाकडून कोण उभे राहणार हे अजून गुलदस्त्यात आहे शरद पवार गट या जागेसाठी उमेदवाराची शोधात आहे.

शेवगाव पाथर्डी:-भाजपच्या मोनिका राजळे या येथील विद्यमान आमदार आहेत. यामुळे ही जागा भाजपलाच मिळणे अपेक्षित आहे. ही जागा भाजपाला मिळाली तरी इथून पुन्हा एकदा मोनिका राहणार अशी शक्यता आहे. मात्र महायुतीकडून अजित पवार गट देखील या जागेसाठी उत्सुक आहे. माजी आमदार घुले येथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार गटाला ही जागा सुटली नाही. आपल्याला या मजुरी मिळाली नाही तर आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो असे संकेत घुले बंधूंनी याआधी दिलेले आहेत. दुसरीकडे महा विकास आघाडी कडून ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता असून प्रतापराव ढाकणे यांना इथून उमेदवारी दिली जाऊ शकते असा अंदाज आहे.

अशा पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील एक संपादकीय अंदाज आणि आराखडा व्यक्त करण्याचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे