आपत्तीत शेतकरीच का कोसळतात!*
नैसर्गिक आपत्ती आली की, शेतकरीच का कोलमडतात. इतरांना त्याचा फटका का बसत नाही? अतिवृष्टी होवो की दुष्काळ पडो आमच्या देशातील शेतकरी देशोधडीला लागतात.
*आपत्तीत शेतकरीच का कोसळतात!*
———————————
नेवासा (प्रतिनिधी) नैसर्गिक आपत्ती आली की, शेतकरीच का कोलमडतात. इतरांना त्याचा फटका का बसत नाही? अतिवृष्टी होवो की दुष्काळ पडो आमच्या देशातील शेतकरी देशोधडीला लागतात. आणि सरकारी नोकर, पुढारी, डॉक्टर, वकील, बिल्डर सारखे व्यावसायिक यांना त्याची जरा सुद्धा इजा होत नाही. असे का आहे?
याचे खरे (मुळातले) कारण असे आहे की, शेतकरी अनेक कायद्यांनी जेरबंद करण्यात आला आहे, त्यामुळे तो आधीच जर्जर झाला आहे. थोडाही अपाय तो सहन करू शकत नाही. आकाश फाटले तर तो कसे सहन करेल?
नोकरदार, पुढारी, व्यापारी, व्यावसायिक यांच्या पायात तशा बेड्या नाहीत म्हणून ते नैसर्गिक आपत्तीत देखील तगून जातात. त्यांना आपत्ती आली काय आणि गेली काय, कळत सुद्धा नाही.
शेतकऱयांच्या नावेत छिद्र करून ठेवले आहे, इतरांचे जहाज भरभक्कम आहे.
पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा, दुष्काळाने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा कायम बंदोबस्त करायचा असेल तर १) कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग) २) आवश्यक वस्तू ३) जमीन अधिग्रहण असे शेतकऱयांना गुलाम करणारे कायदे रद्द करून घ्यावे लागतील. अन्यथा दर वर्षी आपल्याला नुकसान भरपाई किंवा मदत मागत रहावे लागेल. मला वाटते, किसानपुत्रांनी शेतकऱयांच्या बाजूने उभे राहून एकदा सोक्ष-मोक्ष करून टाकावा! शेतकऱ्यांच्या नावेला जे असंवैधानिक कायद्यांचे भोक पडले आहे, ते एकदा बुजवून घ्यावे!
●
नेवासा तालुका शेतकरी संघटना
किसानपुत्र आंदोल