Breaking
ब्रेकिंग

अखेरीस शेतकरी संघटनेच्या लढ्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मिळणार पिक विमा : एडवोकेट अजितदादा काळे

आज शेतकऱ्याच्या खात्यात पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण अजित काळे यांचे हार्दिक अभिनंदन शेतकरी वर्गाकडून व शेतकरी संघटनेला

0 2 2 2 3 3

अखेरीस शेतकरी संघटनेच्या लढ्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मिळणार पिक विमा : एडवोकेट अजितदादा काळे

नेवासा प्रतिनिधी : सन 2022 2023 खरीप पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी नेवासे तालुक्यात वंचित राहिलेले होते . गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी तहसील कार्यालय विमा कंपनी व कृषी कार्यालय येथे चकरा मारत होते . परंतु कोणीही दाद देत नव्हते .एडवोकेट अजित दादा काळे यांनी सदर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले . परंतु नेवासा तालुका पोलीस स्टेशन दिरंगाई करत होते .

अखेरीस 10 सप्टेंबर 2024 रोजी शेतकरी संघटनेने उपोषणाचे हत्यार उपसले .त्यानंतर सर्व प्रशासन खडबडून जागे झाले .एडवोकेट अजित दादा काळे यांनी स्वतः अहमदनगर येथील एच डी एफ सी आर ओ या कंपनीत भेट देऊन अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले .

त्यानंतर सर्व व्यवस्था नरमली व प्रशासन व इन्शुरन्स कंपनीने वंचित शेतकऱ्यांना विमा रकमेची नुकसान भरपाई खात्यावर देण्यास सुरुवात केली आहे .नेवासे तालुक्यातील एकूण 443 विमाधारकांना 42,40,312 रु रक्कम मिळणार असून 63 शेतकऱ्यांना बचत खात्यात रक्कम मिळालेली असून उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या बचत खात्यात रक्कम टाकण्याचे ऑनलाइन काम सुरू आहे .तसेच 2023 24 पंतप्रधान पिक विमा योजना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचे बाबतीत देखील एडवोकेट अजित दादा काळे गंभीर भूमिका घेणार असल्याचे समजते .

या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची भूमिका पाचेगाव येथील श्री अजित किसन  तुवर तसेच शेतकरी  , ,युवा अध्यक्ष डॉ रोहित कुलकर्णी, तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे  श्री नरेंद्र पाटील काळे, दत्तू पाटील निकम, विश्वास मते,  बाबासाहेब नागवडे   जिल्हाध्यक्ष अनिलराव अवताडे  जिल्हा उपाध्यक्ष हरी आप्पा तुवर यांनी विशेष परिश्रम घेतले व सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ शेतकरी यांचे यश.

3.3/5 - (3 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे