Breaking
उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालउद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षउभाटा पक्षकृषीवार्ताक्रांतिकारी पक्षघोंगडी बैठक आरक्षणजयंती राष्ट्रीय पुरुषांचीतहसीलनिवडणूकपंचनामापोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगभारतीय जनता पार्टी पक्षमहा पारेषण कंपनी विद्युत मंडळमाहिती अधिकार 2005राष्ट्रवादी पक्षवैद्यकीय आरोग्य विभागशिबिरशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसंवाद विधानसभासहकारी साखर कारखानासांस्कृतिक कार्यक्रमस्वातंत्र्य दिनहुकूमशाही

आजचा खरा दलित व उपेक्षित शेतकरी

भारत देश कृषीप्रधान आहे असा दावा आता करणे फोल वाटू लागले आहे कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच

0 2 2 1 9 5

नेवासा प्रतिनिधी  आपला भारत देश कृषीप्रधान आहे असा दावा आता करणे फोल वाटू लागले आहे कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत ज्या शेतकऱ्यांच्या कष्टावर व घामावर देशाला कृषीप्रधान ही उपाधी मिळाली त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशाला कलंक ठरत आहे जगामध्ये अविकसित विकसनशील व पूर्ण विकसित देश आहेत तथापि एकाही देशात शेतकरी आत्महत्या करत नाही त्यामुळे ही दुर्दैवी घटना आपल्या देशामध्ये हृदय पिळवटून टाकणारी आहे शेती व शेतकऱ्याला कडक कायद्याचे संरक्षण मिळाली पाहिजे कारण की आता काळाची गरज आहे देश स्वतंत्र झाला तेव्हा 75% लोक शेती व्यवसाय करत होते आज मी तिला 63 ते 64% जनता शेती व्यवसाय करते मात्र हा मोठ्या प्रमाणावरील समाजाचा घटक दुर्लक्षित उपेक्षित झाल्याचे आढळते इसराइल सारख्या छोट्या देशाने अग्रेस्को नावाचा कायदा व संस्था स्थापन करून जगात शेती क्षेत्रात विक्रम प्रस्थापित केला आज आपल्या देशामध्ये भाजीपाला दूध फळे व अन्नधान्य विपुल प्रमाणात कष्ट करून सर्व समाजाला उपलब्ध करून देण्याचे कार्य शेतकरी रात्रंदिवस करत आहे भर पावसात तप्त उन्हात व थंडी सोसत सर्व काम अहोरात्र करत आहे देशामध्ये हरितक्रांती झाली कृषी शास्त्रज्ञाची संशोधन त्या काळातील नेत्यांनी दिलेली शेतीला पाठबळ व शेतकऱ्यांचे कष्ट या त्रिवेणी संगमामुळे भारतात 19 66 मध्ये हरितक्रांती झाली 1975 वर्षात देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला 1977 मध्ये दोन कोटीचा बफर स्टॉक अन्नधान्याचा करून आपण जगाला आश्चर्याचा धक्का दिला जो देश अन्नधान्यासाठी भीक मागत होता त्या देशाने आज अनेक शेतमालामध्ये निर्यातीचे भरीव कार्य केल्याचे आढळते आपला देश दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीत जगामध्ये नंबर एक असला तरी न्युझीलँड मध्ये दूध उत्पादक व पशुपालक शेतकऱ्यांना जे संरक्षण दूध दरामध्ये मिळते त्याचा लवलेशही आपणाकडे नाही अमेरिकेमध्ये अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड देण्यासाठी इरमा नावाचा कायदा अस्तित्वात असून त्याची अंमलबजावणी होत आहे वन्यप्राण्यांकडून झालेले नुकसान किंवा नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ ढगफुटी बर्फ वृष्टी वादळ किंवा दुष्काळ याची तातडीने मदत मिळते सेटलाईट द्वारे त्याचा सर्वे करून त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाते आपल्या देशात मात्र पंचनामे करण्यातच अनेक दिवस निघून जातात त्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे दुधासाठी किरकोळ अनुदान मिळावे यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते दूध मूल्य आयोगाची स्थापना करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे यातच देशाची हित आहे जगामध्ये जवळजवळ 200 देश आहेत त्यामध्ये आपला देश भाजीपाल्याच्या उत्पादनात तिसऱ्या क्रमांक वर असून सुद्धा या देशात भाजीपाल्याचे भाव ठरविण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही भाजीपाला उत्पादन करण्यासाठी जो खर्च येतो त्यापेक्षा कितीतरी कमी दरात बाजारात भाजीपाला विकला जातो. समाजामध्ये शेतकऱ्याचा भाजीपाला फुकट खाण्याची मानसिकता निर्माण झाली आहे त्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे शेतीमालासाठी उत्पादन खर्च वाढत आहे कारण त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांचा खर्च उदाहरणार्थ खते औषधे बी बियाणे मजुरी पाणीपट्टी वीज बिल यांचा खर्च वाढला आहे त्या प्रमाणात महागाई निर्देशांकाचा विचार करून शेतमाला भाव मिळत नाही दुर्दैवाने जनावरांच्या बाजारामध्ये गाई बैल म्हैस यांच्या खरेदी विक्रीच्या पद्धती अत्यंत जुनाट व शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या आहेत हाताची बोटे रुमाला खाली झाकून दलाल व्यवहार करतात शेतकऱ्याला याबाबत अंधारात ठेवले जाते त्याची जनावरे मालकीची असूनही तो हजबल झालेला जनावराच्या बाजारात आढळून येतो आपण थंड प्रदेशातील कोबी फ्लॉवर यासारख्या भाज्या आयात केल्या त्यावर प्रचंड प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे त्याचे अंश भाज्यांमध्ये शिल्लक राहतात त्यामुळे कॅन्सर पॅरॅलिसिस अर्धांग वायू लहान मुलांचे आजार व मोठ्यांचे मेंदूचे आजार वाढत आहे आपण आपल्या रानभाज्या विसरून ही संकट ओढून घेतली आहे अशा अनेक कारणामुळे शेतकरी हा आजचा खरा दलित आहे त्यामुळे दलितांना मिळणाऱ्या सर्व सुविधा सवलती शेतकऱ्यांना देणे काळाची गरज आहे तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील व देशाची नाचक्की थांबून देशावरचा कलंक पुसला जाईल त्यासाठी नियोजन करते विचारवंत अर्थतज्ञ शास्त्रज्ञ शेतकरी संघटनेचे नेते आणि विशेषतः राज्यकर्ते गांभीर्याने लक्ष घालतील तर तो खऱ्या अर्थाने सुदिन म्हणावा लागेल.

खबरनामा यूट्यूब चैनल:-https://youtube.com/channel/UCq-aKbcVC2bxCQ7zVsURDQg?si=YJPar9PW5VpyfJpo

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे