वाकडी येथे शिवरस्त्याच्या खाडीकरण व डांबरीकरणासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांना निवेदन*
दि. ९ एप्रिल २०२५ – वाकडी गावातील नागरिकांनी गावातील मुख्य शिवरस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी आमदार मा. विठ्ठलराव लंघे यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.

*वाकडी येथे शिवरस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांना निवेदन* … नरेंद्र काळे व समवेत शेतकरी
*वाकडी (ता. नेवासा),* दि. ९ एप्रिल २०२५ – वाकडी गावातील नागरिकांनी गावातील मुख्य शिवरस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी आमदार मा. विठ्ठलराव लंघे यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
सदर रस्ता सुमारे दोन किलोमीटर लांबीचा असून, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या रस्त्याचा वापर शेतकरी, विद्यार्थी व ऊस वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. शिवतारे साखर कारखान्याच्या टायर गाड्याही याच रस्त्याने जातात. परंतु, रस्ता सध्या कच्च्या मातीचा असून, त्यावर एकही खडी टाकलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीची मोठी अडचण निर्माण होते. शाळकरी मुलांना आणि शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीला देखील त्रास सहन करावा लागतो.
गावकऱ्यांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडे लवकरात लवकर रस्त्याचे काम मंजूर करून पावसाळ्या पूर्वी काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनावर प्रमुख नागरिक – नामदेव भवार, ज्ञानेश्वर ढोले, अजय काळे, देवदान बनकर, सचिन जवदे, पांडुरंग काळे, श्री. दसपुते, बाळासाहेब बनकर, शेतकरी संघटना प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र काळे, संदीप जवदे, सत्यदान बनकर – यांच्या सह्या आहेत.
हा रस्ता शासकीय नकाशात ‘शिवरस्ता‘ म्हणून नोंद असून, त्याचा समावेश विकास आराखड्यात करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी गावकऱ्यांची आग्रही मागणी आहे.