Breaking
उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनगुन्हेगारीजिल्हाधिकारीब्रेकिंगमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबई

जनहितार्थ मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनाआदेश जारी* 

बिस्फेनॉल वापरातील उत्पादने घातक आजाराचे निमंत्रक ठरत आहेत त्यावर तात्काळ बंदी घाला - राजेंद्र दाते पाटील* 

0 2 2 2 3 3

*जनहितार्थ मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनाआदेश जारी* 

 

*बिस्फेनॉल वापरातील उत्पादने घातक आजाराचे निमंत्रक ठरत आहेत त्यावर तात्काळ बंदी घाला – राजेंद्र दाते पाटील* 

अन्न व औषध प्रशासनाचे 

 वेळकाढू धोरण घातक ठरेल!

 

प्रतिनिधी (मुंबई) -जिवघेण्या कॅन्सर या आजरांस कारणीभुत ठरलेल्या चहा पिण्याच्या कागदी कपा वर तात्काळ बंदी घालण्याचे शासकीय, निमशासकीय तसेच स्थानीक स्वराज्य संस्था,शाळा आदी ठिकाणीसाठी विभागा तील समस्त जिल्हाधिकारी यांना अति तात्काळ जनहितार्थ आदेश निर्गमित करुन कार्यवाही करावी अशी लेखी मागणी मुख्यमंत्री आणि विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक आणि पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज चे सचिव डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी केली होती आहे.

विभागीय आयुक्तांनी आदेश जारी केले होते हे सर्वश्रुत आहे त्यातच मुख्यमंत्री कार्यालयातुन जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना सुद्धा १५ जानेवारी २०२५रोजी आदेश प्राप्त झाले असुन तसा मेलच जिल्हाधिकारी यांना आला असुन त्याची प्रत छत्रपती संभाजीनगर यांना शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक आणि पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज चे सचिव डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी प्राप्त झाला आहे.

आपल्या सविस्तर निवेदनात ते म्हणतात की,चहाचे कागदी कप बनवताना त्याचे उत्पादन करतांना बीपीए ” बिस्फेनॉल ए ” नामक रसायनाचा वापर या मध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. या कागदी कपामध्ये गरम चहा अथवा गरम पाणी टाकल्यास कपाच्या आतील भागात मायक्रो प्लास्टिक वितळते.

कागदाच्या बनवलेल्या आणि फक्त एकदाच वापरावयाच्या कपातून चहा प्राशन करणे आरोग्या साठी हानिकारक आहे. पेपर कपमध्ये असलेल्या प्लास्टिक आणि इतर हानीकारक पदार्थांमुळे गरम द्रव पदार्थ दूषित होतात आणि अशा पद्धतीचे कप तयार करण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर देखील लावला जातो आणि विशेष म्हणजे सदरचा लेयर तथा आवरण हे प्लास्टिकचे बनलेले असते आणि त्यामुळे अशा कप मधील द्रव टिकून राहण्यास मदत होते गरम चहा असल्या मुळें हा लेयर तथा आवरण नंतर अगदी काही वेळातच वितळण्यास सुरुवात होत दिवसातून चार ते पाच वेळेस चहा अशा कपा मधुन प्राशन केल्यास शरीरात प्लास्टिकचे एक लाखा पेक्षा जास्त सूक्ष्म कण प्रवेशीत होतात आणि इथेच आरोग्यास खरा धोका सुरू होतो आणि परिणामतः या कपा मध्ये गरम चहा अथवा पाणी प्राशन केल्यास लाखो मायक्रो प्लास्टिक कण पोटात जातात ज्या मुळे जागो जागी असणाऱ्या अस्थापनेच्या माध्यमातून रुग्ण लाखो नागरिकांना कॅन्सर सारख्या अती दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत आहे.विवीध वापरा सह चहासाठी वापरतअसलेल्या कागदी कपावर बंदी घालण्या बाबत त्यांनी वेळी वेळी वेळी वेळी पाठपुरावा केलेला असुन जिवघेण्या कॅन्सर या आजारास कारणीभुत ठरलेल्या चहा पिण्याच्या कागदी कपा वर तात्काळ बंदी घालण्याचे शासकीय, निमशासकीय तसेच स्थानीक स्वराज्य संस्था,शाळा आदी ठिकाणी साठी विभागातील समस्त जिल्हाधिकारी,जिल्हा परिषेद, महानगर पालिका, नगरपालिका तसेच अन्न व औषध प्रशासन एफ डी ए विभाग यांना आदेश निर्गमित करुन कार्यवाही करणे साठी आणि त्या अनुषंगाने व नियमा प्रमाणे उचित कायदेशीर कारवाई होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाच्या अधिनस्त असलेले सर्वच सार्वजनिक संस्था आदींना जनहितार्थ आदेश व्हावेत अशी अत्यंत जन हिताची मागणी त्यांनी केली असता प्रकरणाचे गांभीर्य पहाता अपर आयुक्त सामान्य प्रशासन विभागीय आयुक्त यांनी मराठवाडा क्षेत्रातील सर्व जिल्हाधिकारी,सर्व सीओ जिल्हा परिषद, विवीध विभागांचे सर्व विभाग प्रमुख या सह अन्न व औषधी प्रशासन सह आयुक्त यांना सुद्धा निवेदनाची दखल घेऊन आवश्यक त्या शासन नियमानुसार कार्यवाही देण्यात आली आहे.

आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिले असल्यामुळे तात्काळ कारवाई होण्यासाठी पावले उचलली जातील.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे