Breaking
ई-पेपरजिल्हाधिकारीदेवगड देवस्थान गुरुवर्य भास्करगिरी महाराजपंढरपूरपंढरपूर स्वच्छता अभियानपोलीस स्टेशनब्रेकिंगमहाराष्ट्रमानव सुरक्षा दिल्लीमानवाधिकार सुरक्षा फेडरेशन महाराष्ट्र राज्यमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यवारकरी संप्रदाय वार्तावारकरी सांप्रदायविशेष निवडवैद्यकीय आरोग्य विभाग

आषाढी यात्रा 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केली पालखी मार्ग, तळांची पाहणी  

भंडीशेगाव येथील सोपानकाका महाराज पालखी सोहळा मुक्कामाचे काम प्रगतीपथावर

0 6 9 6 6 9

आषाढी यात्रा 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केली पालखी मार्ग, तळांची पाहणी  

 

भंडीशेगाव येथील सोपानकाका महाराज पालखी सोहळा मुक्कामाचे काम प्रगतीपथावर

            

          पंढरपूर (दि,16):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 19 व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 20 जुलै रोजी जिल्ह्यात आगमन होणार आहे. तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळे देखील जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. या पालखी सोहळ्यासोबत लाखोंच्या संख्येने वारकरी भाविकांची गर्दी असते.येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. सदर सुविधा बाबतची पाहणी आज जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी केली. 

         आषाढी यात्रा पालखी सोहळा निर्विघ्न व सुखकरपणे पार पाडावा यासाठी शासनाकडून वारकरी भाविकांच्या सोयी सुविधेसाठी तसेच पालखी तळांच्या विकासासाठी मुबलक निधीची उपलब्धता करण्यात आली आहे. वारकरी भाविकांना पालखी तळावर पायाभूत सुविधेसह अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. तसेच पालखी तळावर व मार्गावर कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत याची आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी दिल्या. 

       

         भंडीशेगाव येथे सोपान काका पालखी तळाच्या विकासासाठी शासनाकडून 54 लाख रुपये निधी देण्यात आला असून, जलसंपदा विभागाच्या वापरात नसलेल्या इमारती पाडून सपाटीकरण व मुरमीकरण करण्यात येत आहे तसेच पालखी कट्ट्याचे काम, हायमास्ट दिवे आदी कामे प्रगतीपथावर असून, सदर कामे दर्जेदार करुन,पालखी सोहळा दाखल होण्याच्या आगोदर पुर्ण करावित. तसेच पालखीतळाच्या कट्ट्या शेजारील जुनी इमारत पाडण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. वाखरी येथील पुला शेजारी मुरमीकरण करून उतार करावा, वाखरी पालखी शेजारी तात्पुरती ड्रेनेज करून घ्यावे जेणेकरून पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल होण्याच्या अगोदर सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्तिकेत यांनी दिल्या. 

         यावेळी त्यांनी सरगम चौक वाखरी पूल-वाखरी पालखी तळ, भंडीशेगाव येथील सोपान काका महाराज पालखीतळ, ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ, गुरसाळे, करकंब येथील पालखी तळाची व मुक्कामाच्या ठिकाणची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी, उपस्थित होते.

    ✒️खबरनामा न्यूज प्रतिनिधी , पंढरपूर                                                 

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 9 6 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे