Breaking
उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषी उत्पन्न बाजार समितीकृषी कायदाकृषीवार्ताशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यहमीभाव

शेतकरी मालाला योग्य हमीभाव द्या: शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांचे प्रतिपादन

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावी,"

0 2 2 2 3 5

शेतकरी मालाला योग्य हमीभाव द्या: शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांचे प्रतिपादन

 

*नेवासा प्रतिनिधी:* “शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावी,” असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांनी केले. कारवाडी येथे शेतकरी मेळाव्यात त्यांनी आव्हान केले.

 

आज कारवाडी या गावात येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, कर्जमाफी, शेतमालाची विक्री आणि बाजारपेठेतील अडथळे या मुद्द्यांवर भाष्य केले. शेतमालाला योग्य किंमत मिळाली तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

 

सरकारवर टीका “सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस धोरणे तयार करण्यात अपयशी ठरले आहे. कर्जमाफीच्या घोषणा केवळ निवडणुकीपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. आता शेतकऱ्यांना आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 

शेतकऱ्यांचा पाठीशी भक्कम उभे राहण्याचे आवाहन यावेळी शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले. “आपल्या एकजुटीमुळेच आपल्या हक्कांचा लढा यशस्वी होईल,” असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी अनेक शेतकरी नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारकडे लवकरच निवेदन सादर करण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी श्री हरियाप्पा तुवर जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष अशोक मेजर काळे, उपाध्यक्ष बाबासाहेब नागवडे,या कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉक्टर रोहित कुलकर्णी यांनी केले.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे