पुन्हा आत्महत्या -* *पुन्हा निर्धार* अमर हबीब
10 जानेवारीची बातमी आहे. दहावी शिकणाऱ्या एका मुलाने आत्महत्या केली. बाप शोधत गेला. एका झाडाच्या फांदीवर मुलगा लटकलेला पाहिला. बापाने मुलाला खाली उतरवले आणि स्वतः:त्याच दोराने फाशी घेतली. अस्वस्थ करणारी अत्यंत करून घट

*पुन्हा आत्महत्या -*
*पुन्हा निर्धार*
अमर हबीब
10 जानेवारीची बातमी आहे. दहावी शिकणाऱ्या एका मुलाने आत्महत्या केली. बाप शोधत गेला. एका झाडाच्या फांदीवर मुलगा लटकलेला पाहिला. बापाने मुलाला खाली उतरवले आणि स्वतः:त्याच दोराने फाशी घेतली. अस्वस्थ करणारी अत्यंत करून घटना.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या रोज घटना घडत आहेत. कहाणीचा स्वरूप बदलते पण होते आत्महत्याच! कधी दोन लेकी एकाच विहिरीत उडी मारून जीव देतात. त्यांना वाटते की बाप आपल्या लग्नाचा खर्च करू शकत नाही. कधी एखादी बाई गोठ्यात सारण रचले आणि आपणच ते पेटवून जीव देते. कोणी धर्मा पाटील मंत्रालयात जाऊन जीव देतो. लोह्याचा एक शेतकरी तहसील मध्ये जाऊन मरतो. जेंव्हा लाखो शेतकरी अशा विविध प्रकारे आपल्या अवतीभवती मरत असतील तेंव्हा राज्यकर्त्यांनी काय करायला हवे? मला वाटते राष्ट्रीय आपत्ती मानून इतर सर्व कामे बाजूला ठेवून सरकारने शेतकरी आत्महत्यांचा तिढा सोडवायला हवा. पण सरकार काय करते आहे? शेतकरी आत्महत्या या विषयावर हालचाल तर सोडून द्या, साधी सहानुभूतीची व्यक्त करीत नाही. सत्ताधारी ऐश करण्यात दंग आहेत. सत्ताधाऱ्यांच्या लीला पाहण्यात मीडिया व्यस्त आहे. बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्ते आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. अशा काळात तुम्ही आणि मी काय करू शकतो?
मी असे ठरवले आहे की, आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेतकरी स्वातंत्र्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी 19 मार्च 25 रोजी पुन्हा अन्नत्याग/उपवास करायचा. मला हे माहीत आहे की, मस्तीत मश्गुल असणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारवर माझ्या अन्नत्याग/उपवासाचा परिणाम होणार नाही. जर महाराष्ट्रात गावोगाव असे अन्नत्याग झाले तर त्याला आंदोलनाचे स्वरूप येईल व सरकारला शेतकऱ्यांचा विचार करणे भाग पडेल.
मी माझा निर्धार केला आहे
तुम्ही तुमचे ठरवा!
◆
अमर हबीब, आंबाजोगाई
किसानपुत्र आंदोलन
8411909909
——
शेतकऱ्यांचा गळफास ठरलेले
● कमाल शेतजमीन धारणा कायदा
● आवश्यक वस्तू कायदा
● जमीन अधिग्रहण कायदा
रद्द करा!