Breaking
अहमदनगरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनगुन्हेगारीजिल्हाधिकारीतहसीलदेश-विदेशपंचनामाब्रेकिंगमहाराष्ट्रमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईहुकूमशाही

प्रशासकीय विभाग नाशिक विशेषता अहिल्यानगर तथा अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवान्यांची पुनः पडताळणी, करावी  दिपक पाचपुते यांची मागणी 

अहिल्यानगर तथा अहमदनगर जिल्ह्यातील शस्त्र परवानेधारक व अवैध शस्त्र धारक यांच्यासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने खालील मुद्द्यांवर तातडीने कारवाईची मागणी सामाजिक कार्यकते दिपक पाचपुते यांनी शासनाकडे केली आहे .

0 2 2 2 3 3

प्रशासकीय विभाग नाशिक विशेषता अहिल्यानगर तथा अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवान्यांची पुनः पडताळणी, करावी 

दिपक पाचपुते यांची मागणी 

नेवासा प्रतिनिधी अहिल्यानगर तथा अहमदनगर जिल्ह्यातील शस्त्र परवानेधारक व अवैध शस्त्र धारक यांच्यासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने खालील मुद्द्यांवर तातडीने कारवाईची मागणी सामाजिक कार्यकते दिपक पाचपुते यांनी शासनाकडे केली आहे .

सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले सर्व शस्त्र परवाने तपासून, त्यांच्या वैधतेची व धारकाच्या पात्रतेची चौकशी करण्यात यावी.

नूतनीकरण न केलेल्या परवान्यांची जप्तीः

ज्या शस्त्र धारकांनी त्यांचे परवाने वेळेत नूतनीकरण केलेले नाही, त्यांच्याकडील शस्त्रे जप्त करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

अवैध शस्त्रांवर विशेष मोहीमः

अहिल्यानगर जिल्हा आणि लगतच्या परिसरात विशेष मोहीम राबवून अवैध शस्त्रांची जप्ती करावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

बीड जिल्ह्यासारखी पुनरावृत्ती अहिल्यानगर तथा अहमदनगर जिल्ह्यात टाळावी यासाठी विशेष काळजी घ्यावी

 

श्री. दिपक पाचपुते जिल्हाध्यक्ष ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूह अहिल्यानगर तथा अहमदनगर यांनी पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर; जिल्हाधिकारी अहिल्यानगर, महासंचालक, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, मुंबईः तसेच मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना ईमेलद्वारे ही मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की अशा कार्यवाहीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत होईल.

 

त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तथा अहमदनगर यांना अहवाल आपल्या कार्यालयास सादर केलेल्या अहवालानुसार शस्त्र परवाने रद्द करण्याची कार्यवाही आपल्या कार्यालयाकडून करण्यात आली असेल अर्जदारास अवगत करावे

प्रसारमाध्यमांद्वारे या मागणीला पाठिंबा मिळावा व या विषयाची जनतेपर्यंत माहिती पोहोचावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच, या सूचना सर्व शासकीय अधिकारी यांच्या तात्काळ निदर्शनास आणण्यात याव्यात, ही विनंती याची व्यापक प्रसिध्दी करणेची आहे. अशी मागणी दिपक पाचपुते यांनी केली आहे

1/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे