Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषीवार्ताजलमिशन योजनाजिल्हाधिकारीतहसीलदूध भेसळ कारवाईनाशिकनाशिक आयुक्तालयपंचनामापोलीस स्टेशनब्रेकिंगभ्रष्टाचारभ्रष्टाचार आणि लाच लुचपतमहाराष्ट्रमानवाधिकार सुरक्षा फेडरेशन महाराष्ट्र राज्यमालेगावमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यवन विभागवन्य प्राणी आणि संरक्षण होते शेतकऱ्यांचा भक्षनवृक्षतोडवृक्षारोपण अभियानवृक्षारोपण घोटाळाशासन निर्णय

खबरनामा न्यूज ​शोध सत्याचा, वेध बातमीचा… ​मालेगाव वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागात कोट्यवधींचा वृक्षलागवड घोटाळा?

​• सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांचा गंभीर आरोप; अपर जिल्हाधिकार्‍यांकडे पुराव्यांसह तक्रार दाखल!

0 6 5 3 8 8

 

खबरनामा न्यूज

​शोध सत्याचा, वेध बातमीचा…

​मालेगाव वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागात कोट्यवधींचा वृक्षलागवड घोटाळा?

​• सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांचा गंभीर आरोप; अपर जिल्हाधिकार्‍यांकडे पुराव्यांसह तक्रार दाखल!

​• वाढदिवसाचे औचित्य साधत प्रशासनाला दिली ५ झाडांची रोपे; आंदोलनाचा इशारा.

​मालेगाव (विशेष प्रतिनिधी): मालेगाव वनविभाग (फॉरेस्ट) आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत गेल्या १० वर्षांत करण्यात आलेल्या वृक्षलागवड आणि संगोपनाच्या नावाखाली शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा प्रचंड भ्रष्टाचार आणि अपहार झाल्याचा खळबळजनक आरोप प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप पोपटराव मोरे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पुराव्यांसह लेखी निवेदन सादर केले असून, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

​नेमके प्रकरण काय आहे?

​प्रदीप मोरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सन २०१६ पासून मालेगाव सामाजिक वनीकरण विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सहाय्यक वनसंरक्षण कार्यालय मालेगाव यांना शासनाकडून वृक्षलागवड, संगोपन आणि त्यांच्या संरक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, कागदोपत्री हजारो ते लाखोंच्या संख्येने झाडे लावल्याचे दाखवून या निधीची विल्हेवाट लावली जाते. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर (On Ground) या लावलेल्या झाडांपैकी अल्प प्रमाणातही झाडे जिवंत दिसत नाहीत.

​”गेल्या १० वर्षांत कागदावर दाखवलेली लाखो झाडे गेली कुठे? शासनाचा पैसा नक्की कोणाच्या खिशात गेला?” असा संतप्त सवाल मोरे यांनी प्रशासनाला विचारला आहे.

​माहिती दडवण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न!

​या घोटाळ्याची सत्यता समोर आणण्यासाठी प्रदीप मोरे यांनी दि. १८ मे २०२६ रोजी शासन परिपत्रकानुसार हिशोबाचे व कामांचे शासकीय अभिलेख (रेकॉर्ड) तपासण्यासाठी संबंधित कार्यालयांमध्ये वेळ मागितली होती. परंतु, सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सामाजिक वनीकरण या तिन्ही कार्यालयांतील अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. माहिती दडवण्याच्या या पद्धतीमुळे या विभागात फार मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.

​वाढदिवशी अनोखे आंदोलन!

​नेहमी राजकीय केक कापून किंवा फ्लेक्स लावून वाढदिवस साजरा करण्याच्या प्रथेला फाटा देत, प्रदीप मोरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतीकात्मक स्वरूपात ५ झाडांची रोपे भेट देऊन हे निनावी आणि भ्रष्टाचाराचे वाळवंट थांबवण्याची विनंती केली. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची सध्या मालेगावात जोरदार चर्चा सुरू आहे.

​तक्रारदाराच्या प्रमुख मागण्या:

​सन २०१६ पासून वनविभागाला मिळालेल्या एकूण निधीची आणि प्रत्यक्ष झालेल्या खर्चाची उच्चस्तरीय समितीमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी.

​कागदोपत्री दाखवलेल्या वृक्षलागवडीच्या जागांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे (Physical Verification) करण्यात यावेत.

​शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या आणि माहिती दडवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे.

​तीव्र आंदोलनाचा इशारा!

​”हा केवळ प्रशासकीय भ्रष्टाचार नसून पर्यावरणाचा द्रोह आहे. माननीय अपर जिल्हाधिकारी साहेबांनी या संवेदनशील विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत. जर आठ दिवसांत दोषींवर कारवाई झाली नाही, तर तीव्र लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा प्रदीप मोरे यांनी ‘खबरनामा न्यूज’शी बोलताना दिला.

​या तक्रारीमुळे मालेगाव वनविभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आता अपर जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

​या निवेदनावर प्रदीप पोपटराव मोरे (मु.पो. खडकी, ता. मालेगाव) यांच्यासह निलेश बापू सोनवणे (चंदनपुरी), ज्ञानेश्वर दादाजी जाधव (गिळाणे), तुळशीराम आधार पवार, भाऊसाहेब हरी जगताप (लेंडाणे), दशरथ सजन अहिरराव (लेंडाणे), डॉ. सर्जेराव मोरे, लालबहादूर मोठ्याभाऊ बागुल, दीपक मच्छिंद्र वाकचौरे आणि ॲड. तुषार गुंजाळ (सायने) यांच्यासह परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

​- ब्युरो रिपोर्ट, खबरनामा न्यूज, मालेगाव.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 3 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे