वाकडी गावातील पाणी प्रादुर्भाव: घरांची पडझड आणि शेतांचे 100% नुकसान – तातडीची मदत जाहीर होणार आमदार लंघे साहेब
दलित वस्तीतील घरांची पडझड – रहिवाशांची बिकट अवस्था

वाकडी गावातील पाणी प्रादुर्भाव: घरांची पडझड आणि शेतांचे 100% नुकसान – तातडीची मदत जाहीर होणार आमदार लंघे साहेब
दलित वस्तीतील घरांची पडझड – रहिवाशांची बिकट अवस्था
वाकडी गावातील दलित वस्ती आणि शेतांवर पाणी शिरल्यामुळे झालेल्या गंभीर नुकसानाची पाहणी माननीय आमदार विठ्ठल रावजी लंघे, तहसीलदार संजय बिरादार, तालुका कृषी अधिकारी श्री हिवरे यांनी केली. या भेटीवेळी गावातील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी तसेच महिला उपस्थित होत्या.
नदीच्या पातळीमुळे शेतांचे 100% नुकसान
गावाजवळील नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. पाहणीदरम्यान १००% पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ अत्यंत त्रस्त झाले असून, उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार व प्रशासनाची पाहणी
घरांची पडझड व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान पाहून प्रशासनाने तातडीची मदत देण्याचे आश्वासन दिले.
गावातील मान्यवरांची उपस्थिती
यावेळी वाकडी गावाचे सरपंच शिवाजी जाधव, पाणी वापर संस्था वाकडीचे चेअरमन बडुं उर्फ तुकराम गायकवाड, अंकुश काळे, विकास काळे, न्यायमद भाई शेख, राजेन्द्र कारले, राजेन्द्र काळे, विकास गायकवाड, किसन वडागळे, धर्मरक्षक गणेश चौगुले, भिमराज गायकवाड, शेखर गायकवाड, भऊसाहेब भडके, संपत कराळे, विठ्ठल काळे, भानुदास काळे, जनार्दन जाधव, आकाश वडागळे हे सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचनामे आणि मदतकार्य
कृषी मंडल अधिकारी, तलाठी भाऊसाहेब काळे, ग्रामसेवक व तलाठी यांच्या उपस्थितीत पंचनाम्याची नोंद घेण्यात आली. पंचनाम्याच्या आधारे नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रशासनाची तयारी
गावातील १००% पिकांचे नुकसान आणि घरांवरील पाणी प्रादुर्भाव पाहून प्रशासनाने सतर्कता वाढवली असून, तातडीच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
📌 खबरनामा न्यूज
येथे सविस्तर बातमी पहा लाल बटन ला क्लिक करा आणि खबरनामा न्यूज ची बातमी पहा




