देवगिरी अर्बन क्रेडिट सोसायटीचा ५वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
तीर्थप्रसाद व स्नेहमिलन कार्यक्रमास सभासद, खातेदारांसह परिसरातील मान्यवरांची उपस्थिती


देवगिरी अर्बन क्रेडिट सोसायटीचा ५वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

तीर्थप्रसाद व स्नेहमिलन कार्यक्रमास सभासद, खातेदारांसह परिसरातील मान्यवरांची उपस्थिती
गेवराई, ता. नेवासा : देवगिरी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा ५वा वर्धापनदिन गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित तीर्थप्रसाद व स्नेहमिलन कार्यक्रमास सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार तसेच परिसरातील विविध मान्यवरांनी भेट देऊन संस्थेला शुभेच्छा दिल्या.

“अटूट विश्वास… गुणवत्तेचा ध्यास…” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या देवगिरी अर्बन क्रेडिट सोसायटीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीत सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी वाकडीचे सरपंच तुकाराम उर्फ बंडू गायकवाड, पाणी वापर संस्था जगदंबाचे चेअरमन तसेच परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, सभासद आणि खातेदार यांनी संस्थेला भेट देऊन वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. दिवसभर अनेक सभासद व खातेदारांनी उपस्थित राहून स्नेहमिलनात सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक श्री. शिंदे अमोल, चेअरमन श्री. शिंदे अर्जुन, मॅनेजर श्री. गायकवाड विलास तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आलेल्या मान्यवरांचे, सभासदांचे, खातेदारांचे व हितचिंतकांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून आभार मानले. सभासद व खातेदारांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेची पुढील वाटचाल अधिक सक्षमपणे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.पुढील प्रतिष्ठित व्यक्तींनी भेटी दिल्या पुढील प्रमाणे
नरेंद्र पाटील काळे, संपादक खबरनामा न्यूज
लाडे किशोर — (डॉक्टर)
तय्यब पठाण — (ऑडिटर)
कर्डिले ज्ञानेश्वर — (डेरी फार्म)
मयूर कुलकर्णी — (महिला आर्थिक विकास महामंडळ, नेवासा शाखाधिकारी)
डुकळॆ वाल्मीकी — ( व्यंकटेश मल्टिस्टेट शाखा व्यवस्थापक)
प्रशांत क्षिञॆ — ( व्यंकटेश मल्टिस्टेट डी.एम.)
दारकुंडे ज्ञानेश्वर
कपिले चंदन
कराळे रामकिसन
कराळे अक्षय
किरण तावरे — (डॉक्टर)
फळके निखिल — (संचालक देवगिरी)
संदीप निकाम
अंकुश धनक
शिनगारे दत्तात्रय
राऊत बाळासाहेब

खबरनामा न्यूज | समाजासाठी एक पाऊल पुढे




