Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी उत्पन्न बाजार समितीकृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईकृषी कायदाकृषी मूल्य आयोगकृषीवार्ताकेळी उत्पादक संघटनाकेळी बागातदार संघ महाराष्ट्र राज्यजिल्हाधिकारीतहसीलपंचनामापरभणीपुणेपोलीस स्टेशनब्रेकिंगमहसूल मंत्री व महसूल विभागमहाराष्ट्रमहाराष्ट्र केळी उत्पादक संघ (महाराष्ट्र राज्य)माहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईवसमतशेतकरी आंदोलनसंवाद विधानसभासोलापूरस्वातंत्र्य दिनहमीभाव

हिंगोली जिल्हा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे केळी उत्पादकांची व्यथा मांडली

व्यापाऱ्यांकडून अन्यायकारक भाव – शेतकरी लुटीचा प्रश्न मंत्रीमंडळात मांडण्याचे आश्वासन

0 6 2 0 6 1

 

हिंगोली जिल्हा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे केळी उत्पादकांची व्यथा मांडली

व्यापाऱ्यांकडून अन्यायकारक भाव – शेतकरी लुटीचा प्रश्न मंत्रीमंडळात मांडण्याचे आश्वासन

 

हट्टा (ता. वसमत) दि. १७ सप्टेंबर २०२५

हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्हा पालकमंत्री मा. श्री. नरहरी झिरवाळ साहेब हट्टा येथे आले असता, केळी बागायतदार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शेतकऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली.

या वेळी संघटनेचे नेते श्री. उद्धवजी देशमुख यांनी व्यापाऱ्यांकडून केळीला अन्यायकारक भाव दिला जात असून शेतकऱ्यांची उघड लूट होत आहे, हे वास्तव मांडले. त्यांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशी ठाम मागणी केली.

 

पालकमंत्री झिरवाळ यांनी या समस्येला गांभीर्याने घेत “केळी उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मंत्रीमंडळात मांडण्यात येईल व न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील” असे आश्वासन दिले.

या पाहणी दौऱ्यात माननीय कृषी अधिकारी, उपजिल्हा अधिकारी, जिल्हा अधिकारी तसेच गावकरी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.

👉 केळी बागायतदार संघ महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काचे रक्षण करण्यासाठी पुढील काळात संघटना ठोस पावले उचलणार आहे.

 

✍️ ही माहिती

नरेंद्र पाटील काळे

प्रसिद्धी प्रमुख, केळी बागायतदार संघ महाराष्ट्र राज्य

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे