जलजीवन मिशन भ्रष्टाचार बाबत शासनाची मोठी कारवाई
काँग्रेसचे संभाजी माळवदे यांच्या पाठपुराव्यास मोठे यश


जलजीवन मिशन भ्रष्टाचार बाबत शासनाची मोठी कारवाई
काँग्रेसचे संभाजी माळवदे यांच्या पाठपुराव्यास मोठे यश
(नेवासा प्रतिनिधी )-मजीप्रातील भ्रष्टाचारवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेत चार अभियंत्यांना घरचा रस्ता दाखवत मोठी कारवाई केली. काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी तब्बल तीन वर्ष या घोटाळ्याचा पाठपुरावा करत याविरोधात अनेकदा आंदोलने केली. नेवासा कार्यलयासमोर, अहिल्यानगर कार्यलयासमोर आंदोलने केली.राज्य सरकारकडे याबाबत चौकशीसाठी तक्रारी केल्या. व शेवटी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली. या सर्व पाठपुराव्यामुळे कारवाई करण्यात आली. मजीप्रामधील भ्रष्टाचार माळवदे यांनी उघडकीस आणला. याबाबत पावसाळी अधिवेशनात नेवासा विधानसभेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना प्रश्न देखील उपस्थित करण्यासाठी माळवदे यांनी निवेदन दिले होते. शेवटी सरकारने चार अभियंत्याना निलंबित करत मोठी कारवाई केली.
निलंबित केलेले अधिकारी –
१)एस.एस. दहिफळे ( उपअभियंता नेवासा )
२) एम.पी.धगधगे (तत्कालीन उपाभियंता नेवासा )
३). जी. एस.भोगावडे (कार्यकारी अभियंता, अहिल्यानगर )
४). एस. आर.वारे ( तत्कालीन कार्यकारी,अभियंता अहिल्यानगर )
” लवकरच आझाद मैदानात आंदोलन”
या भ्रष्टाचाराची व्याप्ती अहिल्यानगर जिल्ह्यापूर्ती मर्यादित नसून पूर्ण राज्यभर आहे. हजारो कोटींचा घोटाळा असून पूर्ण राज्यातील घोटाळे बहाद्दरावर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. याविरोधात लवकरच मुंबई येथे आझाद मैदानात आंदोलन करणार – संभाजी माळवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
🟦 मनःपूर्वक आभार! 🟦
जनहिताच्या प्रश्नांवर खबरनामा न्यूज यांनी सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करून या विषयाला प्रभावीपणे वाचा फोडली. तसेच विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनीही या विषयाला प्रसिद्धी देऊन जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यास मोलाचे योगदान दिले.
या प्रसिद्धीची संबंधित प्रशासनाने दखल घेत कार्यवाही सुरू केल्याबद्दल समाधान वाटते.
खबरनामा न्यूजसह सर्व वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, पत्रकार बंधू-भगिनी आणि जनतेचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
– संघर्ष योद्धा संभाजी माळवदे
नेवासा
*✍️ छोटासा प्रयत्न…*
नेवासा तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळयोजनांची रखडलेली कामे, निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी, दोषींवर कारवाई आणि अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी आमदार मा. विठ्ठलराव लंघे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.अजून विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित झालेला नाही पण त्यांना पाठवले
जनतेच्या पाणीप्रश्नासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न, निश्चितच मोठा बदल घडवेल अशी अपेक्षा. 💧🤝
— *लोकहितासाठी सातत्याने प्रयत्नशील*




