Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनजलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजिल्हाधिकारीडाँ राजेंद्र दाते पाटील मराठा आरक्षण अभ्यासक व कायदे तज्ञदेश-विदेशब्रेकिंगभ्रष्टाचार आणि लाच लुचपतमहापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपरिषद निवडणूकमानवाधिकार सुरक्षा फेडरेशन महाराष्ट्र राज्यमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबई उच्च न्यायालय

जेष्ठ जलअभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांचे मत अखेर शतप्रतिशत खरे ठरले! तांत्रिक त्रुटीच पाणीपुरवठ्याचा खरा अडथळा – मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा

२७४० कोटींच्या छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेत राजकीय हस्तक्षेप नको – अन्यथा फौजदारी कारवाई; डॉ. दाते पाटील यांनी वर्षानुवर्षे मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयीन सुनावणीत ठळक

0 6 2 0 6 2

🔴 

जेष्ठ जलअभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांचे मत अखेर शतप्रतिशत खरे ठरले!

तांत्रिक त्रुटीच पाणीपुरवठ्याचा खरा अडथळा – मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा

🟡 

२७४० कोटींच्या छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेत राजकीय हस्तक्षेप नको – अन्यथा फौजदारी कारवाई;

डॉ. दाते पाटील यांनी वर्षानुवर्षे मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयीन सुनावणीत ठळक

📰 सविस्तर बातमी

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर

जेष्ठ जलअभ्यासक तथा पीपल्स फोरम फॉर सोशल कॉजचे सचिव डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी गेल्या दोन-अडीच दशकांपासून सातत्याने मांडलेले तांत्रिक मुद्दे अखेर शतप्रतिशत खरे ठरले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने थेट आणि कठोर भूमिका घेतली आहे.

दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत, नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठा योजनेच्या कामात हस्तक्षेप करू नये, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला. सध्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने, निकालानंतर लोकनियुक्त मंडळ मनपाचा कारभार हाती घेणार आहे. मात्र, तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय योजना कार्यान्वित होऊ शकत नाही, हे मत डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी सातत्याने मांडले होते आणि तेच आता न्यायालयीन निरीक्षणातून अधोरेखित झाले आहे.

🔹 देशातील सर्वात मोठा न्यायालयीन जललढा

सिडको, हडको व संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरासाठी मुबलक व वक्तशीर पाणीपुरवठा मिळावा, यासाठी गेल्या दोन-अडीच दशकांपासून देशातील सर्वात मोठा न्यायालयीन लढा लढणारे एकमेव जलअभ्यासक म्हणून डॉ. दाते पाटील यांची ओळख आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण, तांत्रिक आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिकेचीच आता पुन्हा एकदा सत्यता सिद्ध झाली आहे.

🔹 जॅकवेल आणि २५०० मिमी जलवाहिनीत मोठ्या प्रमाणावर कचरा

नवीन पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेलसह २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत वेल्डिंगचा कचरा व इतर घाण मोठ्या प्रमाणावर साचलेली असल्याचे समोर आले आहे. संबंधित कचरा एक पंप सतत सुरू ठेवल्यास एका महिन्यात, तर दोन पंप सुरू ठेवल्यास अवघ्या १८ दिवसांत स्वच्छ करता येईल, अशी माहिती जीव्हीपीआर कंपनीकडून देण्यात आली आहे.

🔹 कामात अडथळा म्हणजे न्यायालयाचा अवमान

सुनावणीदरम्यान पाणीपुरवठा योजनेत अडथळे आणले जाऊ शकतात, अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,

“योजनेच्या कामात अडथळा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल आणि दोषींवर फौजदारी कारवाई केली जाईल.”

🔹 “चार पंपांशिवाय पाणी लिफ्ट शक्य नाही” – दाते पाटील यांचे मत खरे

चार पंप वापरल्याशिवाय पाणी लिफ्ट करणे शक्य नाही, तसेच पाणी साठवणूक टाक्याच नसतील तर पाणी साठवणार कुठे? हा प्रश्न डॉ. दाते पाटील यांनी भर पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. अखेर हेच वास्तव समोर आले आहे.

🔹 ९०० मिमी लाईनसाठी त्यांचाच यशस्वी पाठपुरावा

९०० मिमी जलवाहिनीचा प्रस्ताव, पाठपुरावा आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेली धडपड अखेर यशस्वी ठरली आहे. हा पर्याय तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचे त्यांनी खूप पूर्वीच मांडले होते.

🔹 नागमोडी पाईपलाईन – भविष्यातील मोठा धोका

जायकवाडीपासून टाकलेली पाईपलाईन नागमोडी असून ती सरळ रेषेत नाही. यामुळे पाण्याच्या दाबामुळे ही लाईन वारंवार फुटण्याचा धोका आहे. भविष्यात ही पाईपलाईन मनपाने ताब्यात घेतल्यास, दोष अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) काम पूर्ण करून निघून जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

🔹 २०० एमएलडी पाणी शक्य, पण नियोजन शून्य

जुन्या ७०० मिमी व १२०० मिमी लाईनमधून १२५ एमएलडी पाणी मिळते. त्यात ९०० मिमी लाईनमधून ७५ एमएलडी मिळाल्यास किमान २०० एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र,

पाणी कुठे साठवणार?

शेवटच्या नळधारकापर्यंत कसे पोहोचवणार?

याचे उत्तर मनपाकडे नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

🔹 जलकुंभांशिवाय वाढीव पाणीपुरवठा अशक्य

विविध भागांत जलकुंभ तत्काळ उभारल्याशिवाय वाढीव पाणीपुरवठा शक्य नाही. नक्षत्रवाडी येथील संतुलित जलकुंभात (एमबीआर) शुद्ध पाणी पडले आहे. मात्र, ७० ते ७५ एमएलडी वाढीव पाणी शहराला देण्याचे नियोजनच नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली होती.

🔹 चार वीज पंपांची तांत्रिक मागणी

नवीन योजनेत ३७०० हॉर्स पॉवरचे तीन पंप बसवले जाणार असून, त्यातील एक पंप बसवून त्याची चाचणी पूर्ण झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

🔹 कर्जवाटपाचा अभ्यासपूर्ण मसुदा

मनपाला कर्ज कसे द्यावे, कंत्राटदारांना बिल अदा करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतचा अभ्यासपूर्ण मसुदा डॉ. दाते पाटील यांनी शासनास दिला होता.

हायड्रॉलिक टेस्टिंगशिवाय बिल अदा करणे भविष्यात घातक ठरणार, असा इशाराही त्यांनी खूप पूर्वीच दिला होता आणि तो आज पुन्हा चर्चेत आला आहे.

2/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे