रद्द कर आंदी, शेती शोषनाचे कायदे* .. संदीप धावडे, वर्धा
सांगू नोको मले पोचट, योजनेचे फायदे, रद्द कर आंदी, शेती शोषनाचे कायदे.

*रद्द कर आंदी, शेती शोषनाचे कायदे*
@ संदीप धावडे, वर्धा
नेवासा प्रतिनिधी कवितेतून सांगितले शेतकऱ्यांच्या समस्या पुढील प्रमाणे पाहू या काव्य माध्यमातून व्यक्त झालेली कवी पुढील प्रमाणे………..
सांगू नोको मले पोचट, योजनेचे फायदे,
रद्द कर आंदी, शेती शोषनाचे कायदे.
स्वामिनाथन आयोगात मारल्या फोकनाळ्या,
वकिलानं लिऊन देल्ल्या डाक्टराच्या गोळ्या.
उत्पादन खर्चाच्या तपशिलात पाय दे.
सांगू नको मले पोचट योजनेचे फायदे।
रद्द कर आंदी शेती शोषनाचे कायदे ..
जोळधंदे, पुरक धंदे पुण्यामुंबयीले सांग जरा,
दाण्याचे शंभर दाने, माया कारखाना बरा.
व्यवसायाले माया, उद्दोगपत्याचा वाव दे.
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे,
रद्द कर आंदी, शेती शोषनाचे कायदे ..
मैस पळते बिमार, देता सुया पखालीले,
लाजवलं सत्तर सालात कासवाच्या चालीले,
चाल यांच्या उपर गावात मले ईचारुन पाय दे
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे
रद्द कर आंदी शेती शोषनाचे कायदे..
दलींदर यादीत आब्रू गोठणावर आली ,
चुलत्या पुतण्यात तंटे, काऊन नावं वरखाली.
सुर्वे चांदाले गिऱ्हाणात, दायदाना मायी माय दे .
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे,
रद्द कर आंदी शेती शोषनाचे कायदे ..
लुटू लुटू केलं राज्या आंदी भिकारचोट,
पादरफुस्के उगयते आता तत्त्वज्ञान मोठं,
शायेतल्या खिचळीले, घरंदाज पर्याय दे.
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे.
रद्द कर आंदी शेती शोषनाचे कायदे ..
मुंजे पोर्र पोरी, अन् पांढरे कपाय,
कवा उगवलं सुर्वे अन् व्हयील सकाय.
फळफळू दे पख माये, मोकये अभाय दे.
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे,
रद्द कर आंदी शेती शोषनाचे कायदे ..
दुखते कुठं, सुखते कुठं मायी मले पुसा,
काय करावं? कसं करावं? मंतर रातदिसा.
आजूक नोको साहेबरावं, मले सव्वाशीन माये दे.
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे,
रद्द कर आंदी शेतीशोषनाचे कायदे ..
फेयर एन्ड लवली लाऊन केला भारताचा ईंडीया.
खेळ्याकळं चाला चाला शायनिंग दांडीया.
मोदी असो नेरु असो , वांझोटेच वायदे.
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे,
रद्द कर आंदी शेतीशोषनाचे कायदे ..
●
कवी – संदीप धावडे, दहिगांवकर (वर्धा)
8605148930 ✍️
—-
*रद्द करा! रद्द करा!!*
शेतकऱयांना गळफास ठरलेले
1) कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग) कायदा
2) आवश्यक वस्तू कायदा
3) जमीन अधिग्रहण कायदा
आदी शेतकरीविरोधी कायदे
*रद्द करा! रद्द करा!!*
●
अमर हबीब, 8411909909
किसानपुत्र आंदोलन
सोमवारची पोस्ट
—-
शेतकरीविरोधी कायदे नीट समजावून घेण्यासाठी वाचा *शेतकरीविरोधी कायदे* ही प्रश्नोत्तर पुस्तिका!
PDF हवी असेल तर 8411909909 या क्रमांकावर नाव, गाव जिल्हा लिहून पुस्तिका पाठवण्याची विनंती करा. Pdf प्रत मोफत पाठवली जाईल. तुम्ही त्याची झेरॉक्स काढू शकता, इतरांना पाठवू शकता.
—-