सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरात चालू आहे. सध्या कारखान्यामध्ये वजन काटा मारी होत असल्याचे तक्रारी आहेत.
महेश खराडे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली*कारखानदारांची काटे मारी

सांगली प्रतिनिधी सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरात चालू आहे. सध्या कारखान्यामध्ये वजन काटा मारी होत असल्याचे तक्रारी आहेत.
काटा मारी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येते भरारी पथक स्थापना करण्यात येते यंदा हंगामा संपत आला तरी अजून समितीची निवड झाली नाही भारी पथकाची स्थापना ही झालेली नाही वजन काटा तपासणी करण्यात प्रश्नच येत नाही शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट सुरू आहे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे यावर्षी पाऊस यामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाली त्या पावसाच्या सातत्याने व्यत्याय येत आहे त्यामुळे ऊस लवकर कारखान्य जाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे मात्र त्याचा गैरफायदा ऊस तोडणी करणारी व कारखानदार दिसून येत आहेत ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्याकडून पैसे घेत आहेत. तसेच काटामारीचा प्रमाण वाढत आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेने आंदोलन करून येणाऱ्या काळात लवकर समिती स्थापन करून भरारी पथक करण्याची मागणी होत असल्याची दिसून येत आहे.
वैद्यमापन शास्त्र विभागाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी पोलीस विभागाचे अधिकारी आणि साखर प्रादेशिक सहसंचालक यांच्या प्रतिनिधी संयुक्त भारी पथक नेमण्यात यावी एखादा साखर कारखान्यात वजन संदर्भात गैरभार होत असल्याची तक्रार संबंधित यंत्रणातून पोलिसाकडे प्राप्त झाल्यास संबंधित भरारी पथकाने तेथे जाऊन वजन काट्याची तपासणी करावी यामध्ये काही प्रकार होत आहेत का? याची शहानिशा करावी गैरप्रकार आढळल्यास संबंधित यंत्रणेमार्फत कारखान्यावर कार्यवाही करावी असे सांगण्यात आले होते त्यानुसार प्रत्येक वर्षी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्ष खालील समिती स्थापन करून बैठकीतली जाते कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी करण्यासाठी भारारी पथक नियुक्ती करण्यात येत येते यंदा डिसेंबर संपला तरी अद्याप समितीची बैठक झाली नाही त्यामुळे भारी पथस्थान मंगल करण्यात आलेली नाही.
*रात्रीचा खेळ चाले.….*
काही ठिकाणी वजन काटे हायड्रोलिक प्रेशरवर चालवतात ते मेनवली ऑपरेट केले जातात यात वजन केल्यानंतर पावतीवर आकडा लिहिताना हात चलाखी ल केली जाते भरलेल्या वाहनाचे वजन कमी व रिकाम्या पा वाहनांची वजन ज्यादा दाखवण्याची चलाकी केली जाते तसेच कर्मचाऱ्याद्वारे वजन काटा ऑपरेट केला व करतेवेळी दाबल्या जाणाऱ्या हायड्रोलिक च्या खाली एक लाकडी पट्टी आडवी टाकली जाते त्यामुळे वजन काटा ठरवताना पर्यंत थांबवला जातो ही काटा मारी बऱ्याचदा रात्री केली जाते.
जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखानदाराकडून काटामोरी केली जाते याकडे जिल्हा प्रशासनाने हेतूपुरस्कार दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. हंगाम संपत आला तरी अजून भरारी पथक तयार केली जात नाहीत यावरून प्रशासनाच्या कारभार उघड झाला आहे
*महेश खराडे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली*