शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या लढ्याला साथ द्या.
विधानसभा निवडणूक 2024 साठी शेतकरी संघटनेने नेवासा मतदार संघातून एडवोकेट अजित काळे राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक 29 10 2024 रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कचेरी नेवासा येथे दाखल करायचा आहे. त्यासाठी नेवासा पंचक्रोशीतील भास्कर गिरीजी महाराज देवगड यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता देवगड येथे
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या लढ्याला साथ द्या.
नेवासा( प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक 2024 साठी शेतकरी संघटनेने नेवासा मतदार संघातून एडवोकेट अजित काळे राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक 29 10 2024 रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कचेरी नेवासा येथे दाखल करायचा आहे. त्यासाठी नेवासा पंचक्रोशीतील भास्कर गिरीजी महाराज देवगड यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता देवगड येथे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शेतकरी चळवळीच्या विचारसरणीच्या शेतकऱ्यांनी ,कार्यकर्त्यांनी व आकारी पडीत शेतकऱ्यांना हजर राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे. एडवोकेट अजित काळे यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने उच्च न्यायालय औरंगाबाद येथून शेतकऱ्याकडून कुठलाही पैपावांना न घेता विना मोबदला आपली वकिलीपणाला लावून आकारिपडीत लढा असो, पिक विमा, कर्जमाफी, विज बिल, वाट पाहण्याचे प्रश्न यामध्ये भंडारदरा निळवंडे सारख्या प्रकल्पांच्या लाभधारक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम गेल्या दहा वर्षापासून करत आहेत. एडवोकेट काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रति दाखविलेली सहानुभूती कार्याची उत्तराही म्हणून मोठ्या संख्येने फॉर्म भरण्यासाठी मोटरसायकलने देवगड येथे उपस्थित राहावे. या निमित्ताने आपणा सर्वांनाच भास्करगिरी महाराज यांचे आशीर्वाद मिळतील आपण सर्वांनी महाराजांचे आशीर्वाद घेऊन शेतकऱ्यांसाठी तन-मन-धनाने काम करणारा उमेदवार म्हणून एडवोकेट अजित काळे यांचा नेवासा मतदार संघातील उमेदवारी दाखल करण्यासाठी देवगड ते नेवासा तहसील मोटरसायकल रॅलीने जाऊन ठीक अकरा वाजता तहसील कचेरी नेवासा येथे फॉर्म दाखल करावयाचा त्यासाठी आपल्या जीवनातील एक दिवस मिळावा अशी कळकळीची विनंती शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्याला पाठवत असलेला मेसेज हेच निमंत्रण समजून आपण यावे.
आपले विनीत शेतकरी संघटना अहमदनगर🙏