*!!! संडे स्पेशल दणका मोडला बेलापूर परळी रेल्वे मार्गाची जमीन हड्पणारांचा मणका !!!*
बेलापूर - परळी रेल्वेमार्ग 90 वर्षापासून प्रलंबीत गेवराई, शेवगाव नेवासे, माजलगाव मराठवाड्याचा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा रेल्वेमार्ग दुर्लक्षीत या तालुक्यांतून झाला होता सर्व्हे*

*!!! संडे स्पेशल दणका मोडला बेलापूर परळी रेल्वे मार्गाची जमीन हड्पणारांचा मणका !!!*
*बेलापूर – परळी रेल्वेमार्ग 90 वर्षापासून प्रलंबीत गेवराई, शेवगाव नेवासे, माजलगाव मराठवाड्याचा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा रेल्वेमार्ग दुर्लक्षीत या तालुक्यांतून झाला होता सर्व्हे*
*[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755*
शेवगांव तालुका दिनांक 16 मार्च रविवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की सन १९२० साली ब्रिटिश राज्यकत्यांनी त्याकाळी मोठी व्यापार पेठ म्हणुन मराठवाड्याची प्रमुख खरेदी केंद्र बेलापूर होते या दृष्टीकोणातून स्वातंत्र्य पूर्व काळात १९२० साली बेलापूर-परळी मार्ग प्रस्तूत करून अहमदनगर जील्ह्यातील हद्दीत जमीन अधिग्रहन केली होती तर बहूतेक ठीकाणी आज ही जमीनीवर भराव टाकल्याच्या खुना दिसून येतात मात्र तदनंतर स्वातंत्र्य संग्रामात हा मार्ग काही वर्षे पूढे ढकलण्यात आल्यानंतर नगर व बीड जिल्ह्यातील शासनकर्ते म्हणा किंवा स्थानीक म्हणा दुर्लक्ष केल्याने काम रेंगाळत गेले ते आज पर्यंत सर्वेक्षण कामाच्या पूढे ढकलले गेले नाही, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केंद्रीय रेल्वे बोर्डाला पन्नास टक्के खर्च उचलण्याचे पत्र दिले होते त्याचे पूढे काय झाले हे समोर आलेले नाही. नेवासा येथील रीतेश भंडारी यांनी या मार्गासाठी संघर्ष समिती स्थापन करून विविध आंदोलने केली
मात्र यश आले नाही तर बेलापूर-परळी मार्ग हा जुना मार्ग खरं तर शासनाला परवडणारा व उत्पन्नाचा होता मात्र बीड जील्ह्यातील व नगर जील्ह्यातील नेत्यांनी आपली राजकीय शक्ती नगर-बीड-परळी याला खर्च केल्याने जुन्या बेलापूर-परळी मार्ग दुर्लक्षीत झाल्याने या मार्गासाठी नागरीकांनाच पूढे यावे लागणार आहे.
बेलापूर- नेवासे – शेवगाव-बोधेगाव- उमापूर- गेवराई माजलगाव-परळी रेल्वे मार्ग देशाचे पूर्व व पश्चिम टोक जोडले जाऊन अनेक महत्त्वाच्या भागातून जातो ज्या भागातून हा मार्ग जातो तो भाग सपाट आहे डोंगरासारखा जास्त खर्च येणार नसल्याने अत्यंत कमी खर्चात हा मार्ग पूर्ण होणार आहे तसेच हा मार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू येथील राज्यात कमीत कमी वेळेत कमी खर्चात जोडले जाते तेव्हा या मार्गावर कारखानदारी नव्हती परंतु आज या मार्गावर अशोक कारखाना श्रीरामपूर, ज्ञानेश्वर कारखाना शेवगाव पाथर्डी, केदारेश्वर कारखाना बोधेगाव, गंगामय्या कारखाना (शेवगाव), जय भवानी कारखाना
(गेवराई), सुंदरनगर कारखाना (माजलगाव), छत्रपती कारखाना (माजलगाव), वैधनाथ परळी, असे दहा ते बारा साखर कारखाने, तसेच गेवराई, शेवगाव, नेवासे, माजलगाव या भागात शेतकर्यांकडून कापसाचे विक्रमी उत्पादन घेतले जात असल्याने या भागात कापसाची जिनिंग व प्रेसिंग कारखाने मोठ्या प्रमाणात आहे, दूध डेअरी उत्पादने फळे भाजीपाला दूध कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादन हुकमी बाजारपेठ या मार्गालगत आहे वरील सर्व कारखान्यांना उत्पादित झालेली साखर ट्रकमध्ये भरून श्रीरामपूर बेलापूर स्टेशन ला आणावी लागते पण यातून इंग्रजांच्या काळापेक्षा सध्याच्या काळात रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे तसेच या मार्गावर श्रीरामपूर येथील राममंदिर, नेवासा चे मोहनीराज मन्दिर, ज्ञानेश्वर मंदिर, देवगड दत्त्राय मंदिर, शिंगणापूरची जगप्रसिद्ध शनी मंदिर, बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वर येथील महानुभव न्ताचे दत्तात्रय मंदिर, राक्षसभुवन येतील साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले शनी देवस्थान मन्दिर, पैठण संत एकनाथ महाराज मंदिर, पैठण येथील प्राचीन संत ज्ञानेश्वर संस्थान, जायकवाडी धरण असल्याने
पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते हा मार्ग कार्यान्वित झाल्यास रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन मोठ्या प्रमाणात रेल्वेला उत्पन्न मिळेल.
बेलापूर परळी मार्ग झाल्यास शिर्डी- श्रीरामपूर-बेलापूर- नेवासे शेवगाव बोधेगाव- उमापूर-गेवराई – माजलगाव-सिरसाळा- परळी- लातूर- बिदर रायचूर कडपा तिरुपती असा जवळचा हा मार्ग झाल्यास जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून नावाजलेले शिर्डी, तिरुपती बालाजी हे बेलापूर परळी या मार्गामुळे साडेपाचशे किलोमीटर अंतर कमी होऊन जवळ येतील कारण शिर्डी येथे आंध्रमधील भाविकांचे तर तिरुपतीला महाराष्ट्रातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते या मार्गाचा रेल्वेला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून आणि कुटुंबीयांचा उदरनिर्वाह रेल्वेवर चालणार आहे तसेच सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या जनतेला कामासाठी स्थलांतर करावे लागत आहे त्यामुळे या मार्गांचे काम अंतर्गत केल्यास सरकारी योजना कारणासाठी रेल्वे योजना पूर्ण होऊ शकते..
*ताजा कलम*
*अहिल्यानगर उत्तर मधील एका वजनदार राजकीय घराण्याच्या नातेवाईक आई चेल्या चपाट्यांचे बंगले बागायती शेती या जुन्या रेल्वेचा शिक्का असलेल्या जमिनींवर असल्याने त्याच वरून कीर्तन आणि आतुन तमाशा सुरु आहे म्हणुन ते मोठं धेंड कायम या योजनेला विरोध करत असत नवरा मेला तरी चालेल सवत रंडकी झाली पाहिजे अश्या प्रवृत्ती मुळे गेल्या शंभर वर्षांपासून रेल्वे रखडली खरं इंगित*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*