Breaking
अहमदनगरकृषीवार्ताजिल्हा सहकारी बँक अहमदनगरतहसीलदेश-विदेशनिळवंडे कृती समिती कोपरगावनिळवंडे धरण कृती समिती कोपरगावनिवडणूकनेवासा तालुकापंचनामापोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगभ्रष्टाचार आणि लाच लुचपतमहा पारेषण कंपनी विद्युत मंडळमहाराष्ट्रमुंबईराजकियराहुरी सहकारी का साखर कारखानाविमा कंपनीशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसंजय गांधी निराधार योजनासंपादकीयसंवाद विधानसभासहकारी साखर कारखाना

नेवासा विधानसभेत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष *ऍड अजितदादा काळे* यांची उमेदवारी कशासाठी ?

नेवासा तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात आमुलाग्र बदल साधण्यासाठी .

0 2 2 1 8 3

नेवासा विधानसभेत

शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष

*ऍड अजितदादा काळे*

यांची उमेदवारी कशासाठी ?

====================

नेवासा प्रतिनिधी…...  नेवासा तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात आमुलाग्र बदल साधण्यासाठी .

नेवासा शहर हि संकल्पना वास्तवात आणण्यासाठी .

नेवासा शहरातील बाजारपेठ सुसज्ज करण्यासाठी .

नेवासा तालुक्यात चांगले रस्ते मिळण्यासाठी .

नेवासा तालुक्यातील राजकीय व अराजकीय दहशत संपविण्यासाठी .

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी .

कारण निवासी तालुक्यात शासकीय दप्तर दिरंगाई मुळे चार मंडळे बसली नव्हती .परंतु अजित दादांच्या कायदेशीर पाठपुराव्यामुळे सर्व मंडळास 88 कोटी रुपयाचा पिक विमा प्राप्त झाला .तसेच 2022 साली असणारे 443 वंचित शेतकऱ्यांना उपोषण ,आंदोलने एवढेच नव्हे तर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून सुमारे 42 लाख चाळीस हजार 382 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले .

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अथवा दुष्काळसूदृश परिस्थितीचे अनुदान मिळवून देण्यासाठी .

महावितरण ने शेतकऱ्यांची कृषी पंपांची वीज तोडताच कायदेशीर धाक दाखवून वीज जोडण्यासाठी .

संपूर्ण विज बिल माफीसाठी अजितदादांनी केलेले अथक प्रयत्न आता शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे .

नेवासे तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला वचक निर्माण करण्यासाठी .

शेतकऱ्यांच्या उसाला किमान पाच हजार रुपये टन भाव मिळण्यासाठी .तसेच उपपदार्थांचा हिशोब साखर सम्राटांना मागण्यासाठी .

दुधाला चाळीस रुपये हमीभाव कायदा करण्यासाठी .कारण अजित दादांनी 23 रुपये प्रति लिटर असणारा दुधाचा भाव ठिकठिकाणी आंदोलने करून तीस रुपये प्रति लिटर व पाच

रुपये अनुदान इथपर्यंत यश नुकतेच मिळवलेले आहे .परंतु आता चाळीस रुपये प्रति लिटर हमीभावाचा कायदाच करण्यासाठी अजित दादांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे .

नेवासा तालुक्यात आजपर्यंत औद्योगिक वसाहत निर्माण झालेली नाही . ही औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी अजित दादांची उमेदवारी गरजेचे आहे .

नेवासे तालुक्यात शेतकऱ्याच्या खिशात पैसा नसल्याने शेतमजूर देखील हवालदिल झालेला आहे . त्यामुळे शेतमालाला रास्त भाव मिळवून बाजारपेठ सशक्त होण्यासाठी .

सोयाबीन, कापूस, मका यासह सर्व अन्नधान्यांची हमीभाव केंद्रे निर्माण करण्यासाठी .

नेवासे तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका ,खाजगी बँका, पतसंस्था व राजकीय पुढाऱ्यांची निगडित वित्तीय संस्था यांची मनमानी व मक्तेदारी थांबविण्याकरिता .

कारण एडवोकेट अजितदादांनी एकही रुपया न घेता केवळ पोर्टल बंद झालेले हजारो शेतकऱ्यांना पाच हजार आठशे कोटींची कर्जमाफी न्यायालयीन लढा देऊन मिळवून दिलेली आहे .

नेवासे तालुक्यातील गोरगरीब निराधार माता भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी .

नुकतेच एडवोकेट अजित दादा काळे यांनी गोगलगाव येथील सुमारे 72 वृद्ध माता भगिनींना शासकीय मदत मिळवून दिलेली आहे .

नेवासे तालुक्यातील घरकुल योजने करिता शासकीय जमिनी नियमित करण्याकरिता व निराधार वंचित लोकांना हक्काचे घर मिळवून देण्याकरिता .

कारण अजित दादांनी संपूर्ण राज्यातील वंचित घरकुल लाभधारकांना जमिनी कायदेशीर करून मिळाव्यात याकरिता न न्यायालयीन लढाई करता कंबर कसलेली आहे .

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी .

भंडारदरा धरणाचे तीन टक्के हक्काचे पाणी आजपर्यंत हे नेवासा तालुक्याला मिळू शकलेले नाही .तसेच लाख कॅनलचे हक्काचे पाणी अद्याप पर्यंतही मिळालेली नाही . हे हक्काचे पाणी मिळविण्या साठी .

शेतकरी विरोधी कायद्यांचा जाच संपविण्यासाठी .

शेतकऱ्यांच्या विरोधात आवश्यक वस्तू कायद्या 1955 सारखे नरभक्षक कायदे आजही अस्तित्वात आहेत .असे जुलमी कायदे रद्द करण्याकरता विधानसभेत आवाज उठवण्यासाठी अजित दादांना पाठविणे गरजेचे आहे .

शेतकरी भावांनो

खूप लढलो लबाडांसाठी

आता लढू मातीसाठी

खरंच शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी एडवोकेट अजित दादांसारख्या स्वच्छ चारित्र्य व कोरी पाटी असणाऱ्या उमेदवाराला विधानसभेत पाठवले तर रस्ता , पाणी वीज या मूलभूत प्रश्नांच्याही पुढे सर्वांचे जीवनमान उंचावण्यात साठी अजित दादांना आपल्या एका एका अनमोल मताची गरज आहे .

शेतकरी संघटनेच्या या प्रामाणिक उमेदवाराकडे तुम्हाला द्यायला पैसा नाही ,चिकन ,मटन ,दारू अशा पार्ट्या नाहीत .भारी भारी वाहनांचा ताफा उभा करण्याकरिता व उन्मत्त चोरांच्या सभा घेण्यात का प्रचंड पैसा नाही .

परंतु एकच गोष्ट आहे ती एकाही प्रतिस्पर्ध्यांकडे नाही .

ती म्हणजे वैचारिक, प्रामाणिक, न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावणे ही गोष्ट कोणाकडेही नाही .

तेव्हा प्रत्येक मतदाराने आपण आपल्या माय माऊलीला आपल्या आईला ,आपल्या बहिणीला ,

मुलीला , पत्नीला आजपर्यंत शेतकरी म्हणून एक तोळा सोडा एक ग्रॅमभर तरी सणावाराला सोनं घेऊन देऊ शकलेलो आहोत का याचा विचार करा, आपल्याला चांगले घर आहे का याचा विचार करा,

आपल्या मुलाबाळांना चांगल्या शिक्षण सुविधा आहेत का याचा विचार करा

आपली मुले चांगले डॉक्टर इंजिनिअर होऊ शकतात काय याचा विचार करा .

आपल्याला एखादा रोग झाला तर आपण चांगल्या दवाखान्यात भेट घेऊ शकतो का याचा विचार करा .कारण सरकारी दवाखान्यात साधी कुत्रे चावले तरी लवकर इंजेक्शन मिळू शकत नाही तेथे आपल्याला कोणत्या महागड्या ट्रीटमेंट मिळणार ?

आपण चिकन मटन दारू घेवून कर्जमुक्त होणार आहोत का ?

आपल्या लाईटच्या प्रश्नांकरिता अथवा कांद्याचे भाव पडल्यावर कोणते राजकीय नेते रस्त्यावर उतरलेले आहेत ?

सर्व मतदार भावाबहिणी वरील सर्व गोष्टींचा विचार अंतर्मुख होऊन करावा ही विनंती नेवासा तालुका शेतकरी संघटना आपणास करीत आहे .

या विचारांती एडवोकेट अजित दादा काळे हे योग्य उमेदवार आहेत की नाही हे तुम्हीच ठरवा ही विनंती .

*नेवासा तालुका शेतकरी संघटना*

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे