भानसहिवऱ्याचा सिंगल फेज चा प्रश्न अखेर मार्गी.
मोहिटे यांचे आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित
भानसहिवऱ्याचा सिंगल फेज चा प्रश्न अखेर मार्गी…..🔥🔥🔥🔥
मोहिटे यांचे आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित 💥💥💥
नेवासा (प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील वाड्या वस्तीवर रहाणाऱ्या नागरिकांना गावठाण प्रमाने नियमित सिंगल फेज सुरू करण्यासाठी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेवासा तालुका सरचिटणीस लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांनी नागरिकांच्या वतीने दिला होता.दिनांक७ आक्टोबर रोजी भानसहिवरे येथे आत्मदहन आंदोलन होणार होते.या आशयाचे निवेदन संबंधित सर्व विभागांना दिली होती.सदर निवेदनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दखल घेऊन पुढील कार्यवाही साठी प्रधान सचिव उर्जा विभाग महाराष्ट्र शासन यांना पुढील कार्यवाही साठी सुचना केल्या आहेत अशा आशयाचा ईमेल मोहिटे पाटील यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे.तसेच त्वरित १८तास सिंगल फेज सुरू करण्याचे व दिनांक ५आक्टोबर पासून सर्व वस्त्यांमध्ये जाऊन गावठाण प्रमाने नियमित सिंगल फेज सुरू करण्यासाठी सर्वे होणार आहे.याचे लेखी पत्र महावितरण ने आंदोलकांना दिले . त्यामुळे ७आक्टोबर रोजी होणारे सामुदायिक आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांनी सांगितले.तसेच कामांत दिरंगाई झाली तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.यावेळी भा.ज.पा.अनुसुचित जाती मोर्चा चे तालुका उपाध्यक्ष मानव साळवे, भाजपा युवा मोर्चा चे देविदास पटारे, चांगदेव दारूंटे, अमोल साळवे, दिलीप शिरसाट, रघुनाथ काळे, डॉ नानासाहेब भोगे, शशिकांत बेहळे यांचे सह नागरिक , महावितरण चे कर्मचारी उपस्थित होते.सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा करून आंदोलन यशस्वी केल्याबद्दल नागरिकांनी लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांना धन्यवाद दिले. खबरनामा न्यूज यांनी प्रथम वृत्त प्रकाशित केले होते शासन दरबारीची लवकर दखल घेतली त्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.