ऊस दरासाठी भविष्यातील निवडणुकांमध्ये मुरकुटे कुटुंबीयांना पराभव दाखवा-जिल्हाध्यक्ष अनिल औताडे.
अशोक सहकारी साखर कारखान्याची 25 सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली परंतु सदर सभेवर शेतकरी संघटनेने बहिष्कार टाकला होता.
ऊस दरासाठी भविष्यातील निवडणुकांमध्ये मुरकुटे कुटुंबीयांना पराभव दाखवा-जिल्हाध्यक्ष अनिल औताडे.
शिरजगाव प्रतिनिधी-
अशोक सहकारी साखर कारखान्याची 25 सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली परंतु सदर सभेवर शेतकरी संघटनेने बहिष्कार टाकला होता. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अशोकचे सर्वेसर्वा विद्यमान अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांना सातत्याने कायदेशीर मार्गाने व आंदोलनाच्या माध्यमातून वेळप्रसंगी चुकीच्या कामकाजाबाबत सनदशीर मार्गाने शेतकऱ्यांच्या हितरक्षणार्थ विरोध दर्शविला. सातत्याने अशोक कारखान्याची सर्वसाधारण सभा ही सभासद व कामगारांच्या हितरक्षणार्थ न होता नाटकी राजकीय व स्वतःच्या कौटुंबिक चिखलफेक करून गुंडाळलीं जात आहे. मागील अशोकच्या निवडणुकीत कारखाना कामकाजावर चर्चा न होता सासरा व सुनेने नौटंकी करून स्वतःच्या कुटुंबाभोवती चर्चा करून सभासदांची दिशाभूल केली. एकाच कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात व संघटनेत राहून नाटकी विरोध दर्शवून तालुक्याची फसवणूक करत आहे. असाच प्रकार अशोकच्या सर्वसाधारण सभेत गेल्या तीन वर्षापासून बघावयास मिळतआहे .परंतु अशोक कारखाना हा साडेबारा हजार सभासदांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना असून मुरकुटे कुटुंबीयांची खाजगी जहागिरी नसल्याचे भान मुरूकुटे कुटुंबीयांना राहिले नाही.कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांना अशोकच्या ऊस उत्पादक सभासदांनी प्रवराच्या ऊस दरावर बोट ठेवून मागील वर्षाच्या 3200 /-रुपये प्रति टनाची मागणी केली .तसेच संजीवनी कोळपेवाडी इतका दर मिळावा अशीही अपेक्षा व्यक्त केली. परंतु याबाबत व्यवस्थापन नेतृत्वाने ऊस उत्पादक सभासदांच्या मागणीचा आदर न करता धूळ फेकच केली. वास्तविक अशोकने स्वमालकीचा को-जन प्रकल्प उभा केला तर प्रवरेने बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभा केला. त्यावेळी मुरकुटे यांनी आपल्या मालकीचा प्रकल्प असल्याचे अभिमानाने सांगितले तर प्रवरेचा प्रकल्प हा बीओटी तत्त्वावर असल्याने आपल्या ऊस उत्पादकांना को -जनचे जादा पैसे देता येतील. तसेच भानुदास मुरकुटे हे अखिल भारतीय डिशलरी असोसिएशनचे अध्यक्ष असताना त्यांचे मध्यार्क प्रकल्प उभे करण्यासाठी कुणी हात धरले होते. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर- माळेगावसारख्या कारखान्याकडे कुठलेही मद्यार्क प्रकल्प नसताना 3500 ते 3800 रुपये दर देऊ शकतात. नगर जिल्ह्यातील इतर कारखाने अशोक पेक्षा पाचशे ते सहाशे रुपये जास्त देऊ शकतात याबाबतचे चिंतन करण्याची गरज आहे. परंतु मुरकुटे यांच्या म्हणण्यानुसार राजकीय पराभवाला घाबरून जर प्रवरेचे नेते जास्तीचा भाव देत असेल तर तो कारखाना आदर्श कारखाना होऊ शकत नाही. याबाबत पराभवाला न घाबरनाऱ्या नेत्यांनी कमी दर द्यायचे का असाही प्रश्न निर्माण होतो . वास्तविक अशी बेताल वक्तव्य करून ऊस उत्पादकांची पिळवणूक व फसवणूक होत असलेचे दिसून येत आहे. मागिल गेल्या तीन वर्षापासून तीन वर्षापासून सातत्यानेशेतकरी संघटनेच्या माध्यमातून अशोकच्या ऊस उत्पादक सभासदांना आव्हान करण्यात येते की येणाऱ्या निवडणुकांमध्ये भानुदास मुरकुटेसह त्यांच्यासोबत कारखाना, बाजार समिती व विधानसभेला एकत्र असणाऱ्या नेत्यांचा पराभव केल्याशिवाय अशोक कारखान्याच्या सभासदांना उसाचे दाम मिळणार नाही. सातत्याने कमी दर देणारा अशोक कारखाना 500 कोटी कर्ज तसेच आज अखेर 31 कोटी रुपये संचित तोटा, सदर कर्ज हे मुरकुटे कुटुंबियांवर नसून साडेबारा हजार सभासदांच्या सातबारा उताऱ्यावर आहे याचे भान सभासदांना असायला हवे. तसेच सातत्याने कामगारांचे सहा सहा महिने पगार थकविणे, तीन तीन महिने उसाचे पेमेंट उशिराने अदा करणे, सभासदांचा ऊस वेळेवर न तोडणे, सर्व साधारण सभेत सभासदाना मारहाण करणे, गुंडांकडून धमक्या देणे, अश्लील भाषेत सर्वसाधारण सभेत बोलणे, 50 लाख रुपयांचे भंगार चोरी जाणे, भंगार चोरी गेल्यानंतर पंधरा दिवसांनी 25 लाख रुपये किमतीचे भंगार चोरी गेल्याचा उशिराने एफ. आर. आय. दाखल करणेअसा कारखाना भानुदास मुरकुटे यांच्या मते आदर्श कारखाना असल्याचे धादांत खोटे भासवले जात असेल तर भविष्यात सभासद विचार केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कालच्या झालेल्या अशोक कारखाना सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांच्या भाषणाचे खंडन शेतकरी संघटनेच्या प्रसिद्धी पत्रक काढून करण्यात आले. पत्रकावर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रभाकर कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, डॉ. दादासाहेब आदिक, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, विकास नवले, एडवोकेट प्रशांत कापसे, शरद असणे, शरद पवार, बाळासाहेब जाधव, गोविंद वाघ, अशोकराव कहांडळ, अरुण मुठे, दौंडसर,कार्लस साठे, ईश्वर दरंदले, प्रतीक गायकवाड,दिलीप औताडे, सागर गिऱ्हे, संजय वमने, सतीश नाईक, बबनराव नाईक, बबनराव उघडे, इंद्रभान चोरमळ, अहमदभाई शेख, शैलेश वमने, कैलास पवार, अनिल रोकडे , अकबर शेख आदी संघटनेच्या सभासदांनी काढले