हाजिर हो… गृह मंत्रालयाच्या सचिवासह उच्चपदस्थ पोलीस अधिकारी, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांसह पोलिस अधिकाऱ्यांना खंडपीठाची नोटीस… अवमान याचिका
जिल्हा पेठ पोलिसांनी केलेल्या अटकेविरुद्ध विजय भास्करराव पाटील यांनी छत्रपती संभाजी नगर येथील खंडपीठात दाखल केली होती अवमान याचिका

- हाजिर हो… गृह मंत्रालयाच्या सचिवासह उच्चपदस्थ पोलीस अधिकारी, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांसह पोलिस अधिकाऱ्यांना खंडपीठाची नोटीस… आवमान याचिका
जिल्हा पेठ पोलिसांनी केलेल्या अटकेविरुद्ध विजय भास्करराव पाटील यांनी छत्रपती संभाजी नगर येथील खंडपीठात दाखल केली होती अवमान याचिका
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह सर्वांना नोटीस देत 21 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी हजर राहण्याचे खंडपीठाचे आदेश…
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी केलेल्या अटकेच्या विरोधात विजय भास्करराव पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत छत्रपती संभाजी नगर येथील खंडपीठात अवमान याचिका दाखल केली होती. या अवमान याचिकेवर 6 मार्च रोजी खंडपीठात कामकाज पार पडले. खंडपीठाने गृह मंत्रालयाचे सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक , जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक , सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह इतरांना नोटीस काढल्या असून 21 मार्च 2025 रोजी होणाऱ्या सुनावलेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वाद प्रकरणात १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच कर्मचाऱ्यांनी ऍड विजय भास्करराव पाटील यांना त्यांच्या राहत्या करून ताब्यात घेतले. कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. तसेच ताब्यात घेण्या बद्दलचं कुठलेही कारण त्यांना सांगितलं नाही अथवा कुठली नोटीस न देता त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तब्बल दोन ते अडीच तास बसून ठेवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता म्हणजेच तब्बल ५ तासानंतर . विजय भास्करराव पाटील यांना अटक दाखविण्यात येऊन पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले. याबाबत विजय भास्करराव पाटील यांनी मानवाधिकार आयोग यांच्यासह पोलीस महासंचालक व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना मेलद्वारे तक्रार केली होती. या प्रकरणात विजय भास्कर पाटील यांना दोन दिवसाचे पोलीस कोठडी सुनावण्यात आली व त्यानंतर 23 डिसेंबर रोजी जामीन मंजूर झाला.
ज्या गुन्ह्यात अटक केली ते गुन्हा चार वर्षांपूर्वीचा होता. मात्र अटकेची कुठलीही कारण न सांगता अटक करण्यात आली. बेकायदेशीर पद्धतीनं अटक करण्यात येवून सुप्रीम कोर्टाचा अर्णेश कुमार खटला तसेच सत्येंद्र कुमार अनटील यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार व त्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन असेच पोलीस यंत्रणा यांना दिलेल्या निर्देशांचा अवमान झाल्याच स्पष्ट करत ॲड विजय भास्करराव पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात २९ जानेवारी २०२५ रोजी गृह मंत्रालयाचे सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक , जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक , सहायक पोलीस निरीक्षक तसेच यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात अवमान याचिका दाखल केली होती.
विजय भास्करराव पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ६ मार्च २०२५ रोजी कामकाज पार पडले. या विजय पाटील यांच्या वतीने ॲड अजित काळे यांनी काम पाहिले. विजय पाटील यांना करण्यात आलेली अटक कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे व सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचा कशा पद्धतीने अवमान झाला आहे अशी बाजू मांडत कागदपत्र सादर केले. सकृत दर्शनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर खंडपीठाने न्यायमूर्ती यांनी गृह मंत्रालयाचे सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक , जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक , सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह इतरांना नोटीस काढल्या असून पुढच्या सुनावणीला आज राहण्याचे आदेशित केले आहे. खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभाग कंकणवाडी व न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठांसमोर हे कामकाज पार पडले. या प्रकरणात 21 मार्च 2025 रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात श्री.विजय भास्करराव पाटील यांच्या बाजूने ॲड. अजित काळे हे काम पाहत आहे.