28 सप्टेंबर 2024 रोजी शिरसगाव येथे जगदंबा माता मंदिरात इमारत बांधकामगार मंडळ व साई सेवा हॉस्पिटल नेवासा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर संप
समर्पण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले यांनी बांधकामगार यांना आरोग्य विषयी व हेल्थ कार्ड संबंधी माहिती दिली
नेवासा (प्रतिनिधी)28 सप्टेंबर 2024 रोजी शिरसगाव येथे जगदंबा माता मंदिरात इमारत बांधकामगार मंडळ व साई सेवा हॉस्पिटल नेवासा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले यावेळी समर्पण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले यांनी बांधकामगार यांना आरोग्य विषयी व हेल्थ कार्ड संबंधी माहिती दिली व तसेच इमारत बांधकामगाराला साई सेवा हॉस्पिटल नेवासा फाटा या ठिकाणी संपूर्ण उपचार व मेडिकल मोफत दिले जाईल असे सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे प्रगतशील शेतकरी पुरुषोत्तम सर्जे सुनील राव वाघमारे सचिन काळे एडवोकेट कावळे भाऊसाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी अरुणराव देशमुख माजी सरपंच नवनाथ देशमुख उपसरपंच दत्तात्रय पोटे तसेच इमारत बांधकामगार उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश लंघे यांनी केले तर सूत्रसंचालन शेतकरी संघटनेचे बापूसाहेब देशमुख यांनी केले आभार दादासाहेब नाबदे यांनी मानले