नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे *जलसंधारण मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील* यांचेसह सर्व आमदारांना कजमाफीसाठी स्मरणपत्र.. तालुकाध्यक्ष अशोक मेजर काळे
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी मा . नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सह उपस्थित सर्व आमदार आणि विधान परिषदेचे सभापती मा . ना . प्रा .राम शिंदे यांना नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनेने कर्जमाफी संदर्भात स्मरणपत्र दिलेले आहे .

नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे
*जलसंधारण मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील* यांचेसह सर्व आमदारांना
कजमाफीसाठी स्मरणपत्र
नेवासा – आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी मा . नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सह उपस्थित सर्व आमदार आणि विधान परिषदेचे सभापती मा . ना . प्रा .राम शिंदे यांना नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनेने कर्जमाफी संदर्भात स्मरणपत्र दिलेले आहे .
महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष माननीय एडवोकेट अजित दादा काळे यांनी शेतकरी संघटनेतर्फे नेवासा विधान सभेकरीता उमेदवारी केलेली होती . परंतु महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर पाठिंबा देत एडवोकेट अजित दादा काळे यांनी उमेदवारी मागे घेतलेली होती .
सद्यस्थितीला महायुतीचे सरकार रा ज्यात प्रबळरीत्या निवडून आल्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत .त्यासाठी नेवासा तालुका शेतकरी संघटनेने तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे व जिल्हा उपाध्यक्ष हरी अप्पा तुवर यांच्या उपस्थितीत मंत्री महोदयांना विनाअट संपूर्ण कर्जमाफीचे स्मरणपत्र दिले .या स्मरणपत्रा बरोबरच तुर व कापूस यांची हमीभाव केंद्रे त्वरित चालू करावीत, तसेच दुधाला चाळीस रुपये हमी भावाचा कायदा करावा आणि शेतकऱ्यांना कृषी पंपांना दिवसा लाईट मिळावी याकरिता मागणी करण्यात आली .
यावर भाष्य करताना नामदार राम शिंदे म्हणाले की या कर्जमाफीच्या मुद्द्यावर निश्चितच विधानसभेत चर्चा घडवून आणली जाईल आणि पुढील कार्यवाही करण्याचे संकेत मिळालेले आहेत .
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरि अप्पा तुवर, तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे, युवाध्यक्ष डॉ रोहीत कुलकर्णी , तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे, अॅड शिरसाठ, दादासाहेब नाबदे भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे बापूसाहेब देशमुख सुधाकर देशमुख, दत्तु पा . निकम भास्करराव तुवर कैलास पाटील पवार जेष्ठ नेते प्रदीप नवले शहराध्यक्ष शेतकरी संघटना विश्वास मते किरण दादा लंघे , सोमनाथ औवटी यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते .