संतवाणी: माणसाच्या जीवनातील सुंदर अनुभूती – ‘मैत्रभाव’
सदर: संतवाणी :मैत्रभाव:


संतवाणी: माणसाच्या जीवनातील सुंदर अनुभूती – ‘मैत्रभाव’
सदर: संतवाणी
:मैत्रभाव:
माणसाच्या जीवनात मैत्री ही सर्वात सुंदर आणि माणसाला माणूस म्हणून परिपूर्ण करणारी एक अनुभूती आहे.
एक मन हे दुसऱ्या मनाशी जुळल्या शिवाय जीवनही परिपूर्ण होत नाही.
मानवी जीवनातील बहुतेक दुःख ही मैत्रभावाच्या कमतरतेमुळे म्हणा कि किंवा मैत्री आड येणाऱ्या मायावी शक्तींनी म्हणा निर्माण केलेले आहेत
अन याच मायावी शक्तींनी माणसाला त्याच्या आनंदा पासून पारख केलं आहे
कवि म्हणतो मळ्यास माझ्या कुंपन पडणे अगदी मला न साहे वैयक्तिक , आध्यात्मिक,वा सामाजिक जीवन रुपी मळ्याला जात,धर्म, पंथ,स्री-पुरुष,गरिब-श्रीमंत अशा विविध प्रकारच्या कुंपनांनी वेढलेले दिसते. ही कुंपण तोडुन मोकळ्या हवेत श्वास घ्यायची सवय लावली पाहीजे. मग सारा संसार तेजोमय दिसू लागतो.भासू लागतो….अन हा तेजाचा अनुभवच व्यापक होत ईश्वराकडे घेवुन जात असतो.
म्हणून या सर्व कुंपनांना तोडुन भवपाश सोडवून,स्वतःला देहाच्या नश्वर धर्माचा स्पर्श न होऊ देता,जो अव्यक्त लोकातून या मर्त्य लोकांत अवतरण करतो..त्या सत्यम, शिवम सुंदरम अशा परमात्म्याशी मैत्री करणं हा खरा राजयोग आहे.
या राजयोगांने एकदा ईश्वराशी नातं घट्ट जुळवलं कि एका सुंदर मैत्रीला बहर येवू लागतो अशी ईशमैत्रीच साधकाला परिपूर्ण करू शकते…ईश्वरांशिवाय ईतर व्यक्तीशी मैत्री ही अपुर्ण असते.म्हणून सार एकच..तर तो आहे ईश्वराशीमैत्री करण्यांत…!
मात्र ही उच्च जीवनाची साधना आहे.हे भान सुटू देता कामा नये..! त्या आधी प्रयोग म्हणून निसर्गाशी,आकाशाशी,लता वेलींशी मैत्री करुयात..!पाहू जेवढं जमेल तेवढं करुयांत..पण मैत्री करुयां…मैत्रधर्म वाढवूयां…!!💐💐🙏
