पावसाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येकाने वृक्षारोपण करावे: प्रमोद दादा मोरे
पावसाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येकाने वृक्षारोपण करावे: प्रमोद दादा मोरे


पावसाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येकाने वृक्षारोपण करावे: प्रमोद दादा मोरे
श्रीरामपूर येथे पर्यावरण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न; ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प!
श्रीरामपूर:
पावसाळ्याच्या ऋतूमध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण केल्यास व वृक्ष संवर्धनाचे काम नैसर्गिकरित्या व्यवस्थित होते त्यामुळे पावसाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येकाने झाडे लावून वृक्षारोपण करावे असे प्रतिपादन श्रीरामपूर आगार येथे वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांनी केले.
मंगळवार दि. ७ जुलै रोजी एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त “७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प”या उपक्रमाअंतर्गत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, श्रीरामपूर आगार तसेच प्रवासी संघटना, श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
हरित महाराष्ट्रासाठी घेतली प्रतिज्ञा
पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त समाजाची निर्मिती आणि हरित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी राज्यभर ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा केली.
कार्यक्रमाला मान्यवरांची मांदियाळी
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
मा. प्रमोददादा मोरे (राज्याध्यक्ष, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ)
प्रा. डॉ. अनिल लोखंडे सर (राज्य उपाध्यक्ष)
बाळासाहेब डोंगरे (अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष)
अनिल बेहेरे (श्रीरामपूर आगार प्रमुख)
किशोर फुणगे (प्रवासी संघटना)
छायाताई राजपूत(कार्याध्यक्षा)
निर्मलाताई मस्के (कार्याध्यक्ष)
राजश्री जाधव** (छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षा)
शोभाताई काळे
श्री. बाळासाहेब ढोले (आदर्श सरपंच)
अर्जुन राऊत (जिल्हा संघटक)
श्री. बाळासाहेब गाडेकर (राज्य संघटक)
प्रा. चंद्रकांत भोजने
(राज्य मीडिया प्रमुख)
श्री. आनंदा झरेकर, हरिभाऊ शिंदे
सोपान वायाळ (निवेदक)
सौ. मीनाक्षीताई मोरे, सौ. वंदनाताई भोजने, सौ. स्वाती वायळ, वैष्णवी मोरे
तसेच एसटी अधिकारी, कर्मचारी, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
> “वृक्षलागवड ही काळाची गरज!”
> याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे सांगून, ऑक्सिजन देणारे जास्तीत जास्त झाडांचे वृक्षारोपण करावे तसेच समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.
>
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यक्रमास पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी सदस्य, श्रीरामपूर आगाराचे अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
– विशेष प्रतिनिधी, खबरनामा न्यूज




