सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी ३०० कोटींच्या फेलोशिपला मंजुरी-डॉ राजेंद्र दाते पाटील यांच्या पाठपुराव्यास यश
संशोधन करणाऱ्या मराठा, कुणबी- मराठा व मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना सारथीकडून फेलोशिप दिली जाते. परंतु निधी अभावी ४८० विद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून फेलोशिप मिळत नव्हती. या बाबत सातत्याने सारथी संस्था व राज्य शासनाकडे डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी पाठपुरावा केला मुळे संशोधक विद्यार्थी वर्गास न्याय मिळाला आहे.

सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी ३०० कोटींच्या फेलोशिपला मंजुरी-डॉ राजेंद्र दाते पाटील यांच्या पाठपुराव्यास यश
मुंबई (प्रतिनीधी)संशोधन करणाऱ्या मराठा, कुणबी- मराठा व मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना सारथीकडून फेलोशिप दिली जाते. परंतु निधी अभावी ४८० विद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून फेलोशिप मिळत नव्हती. या बाबत सातत्याने सारथी संस्था व राज्य शासनाकडे डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी पाठपुरावा केला मुळे संशोधक विद्यार्थी वर्गास न्याय मिळाला आहे.
सारथी अंतर्गत पीएचडी फेलोशिप साठी वर्ष २०२२-२३ मध्ये ९६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांका पासून फेलोशिप देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने तात्काळ घ्यावा अशी मागणी डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी केलेली होती त्या नंतर ९६९ विद्यार्थ्यांपैकी ८१० विद्यार्थ्यांनी सहामाही प्रगती अहवाल सादर करीत संशोधनकार्य सुरु केले. मात्र केवळ ३२४ विद्यार्थ्यांची अधि छात्रवृत्ती जमा करण्यात आल्याचे त्यांनी शासनाच्या व सारथीच्या लक्षात आणुन दिली होते त्यामुळे ४८० विद्यार्थ्यांना अजूनही फेलोशिप न मिळाल्याने त्यांचे संशोधनकार्य पूर्ण होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.
यावर सारथी साठी वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.तसेच संशोधनकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वरित अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सारथी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे मागील ३ वर्षांपासून फेलोशिप मिळण्या च्या प्रतीक्षेत असलेल्या जवळपास ४८० मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असुन सर्व स्तरातून डॉ राजेंद्र दाते पाटील यांचे न्याय मिळवुन दिल्या बद्दल आभार मानण्यात येत आहे.
सारथी प्रशासन कार्यकारी संचालक निंबाळकर सर्व संचालक मंडळ प्रकल्प संचालक देशमुख यांचे सुद्धा सहकार्य केल्या बद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहे.