Breaking
ई-पेपरतहसीलदार नेवासादेवगड किसनगिरी बाबा संस्थान नेवासानेवासापंढरपूरपोलीस स्टेशनब्रेकिंगवारकरी संप्रदाय वार्ताश्री शिंगणापूर तीर्थक्षेत्र नेवासाश्री संत ज्ञानेश्वर देवस्थान नेवासा पालखी सोहळासंत वाणी

भक्तीचा सागर ओसंडला! गुरुपौर्णिमेनिमित्त सोनई-देवगड भाविकांची अलोट गर्दी

भगवान दत्तात्रेयांचे दर्शन, कीर्तन, प्रवचन अन्‌ महाप्रसादाने धार्मिक स्थळे गजबजली

0 7 0 1 7 0

भक्तीचा सागर ओसंडला! गुरुपौर्णिमेनिमित्त सोनई-देवगड नेवासा परिसरात भाविकांची अलोट गर्दी

भगवान दत्तात्रेयांचे दर्शन, कीर्तन, प्रवचन अन्‌ महाप्रसादाने धार्मिक स्थळे गजबजली

खबरनामा न्यूज नेटवर्क / सोनई नेवासा:

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर सोनई आणि परिसरातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये श्रद्धेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रसिद्ध देवगड धाम येथे श्री भगवान दत्तात्रेय आणि सद्गुरू किसनगिरीबाबा यांच्या समाधीच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या भाविकांच्या रांगांमुळे संपूर्ण देवगड परिसराला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

याप्रसंगी महंत भास्करगिरी महाराज आणि स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीस महाअभिषेक व पूजन पार पडले. सद्गुरू किसनगिरीबाबांच्या समाधी स्थळाला विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर परिसर व रस्त्यांवर स्वच्छता राखण्यासाठी स्वयंसेवकांनी विशेष योगदान दिले.

 परिसरातील आश्रमांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

 सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम: गुरुपूजनानंतर महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे संगीतमय प्रवचन झाले. “व्यास पौर्णिमेचे औचित्य साधून जीवनात सत्संगाचे रोपटे रुजवणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर भागवत, नाचन, खोसे व पंडित परिवाराकडून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

 संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान: वैसाखांब व बन्सी महाराज तांबे यांच्या मूर्तीस अभिषेक करून वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांचे ओघवत्या शैलीतील कीर्तन पार पडले.

 

 स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र (सोनई): सोनईतील केंद्रात १२ तासांचा अखंड गुरुपद सोहळा रंगला. सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीने सुरू झालेल्या या सोहळ्यात २०० हून अधिक महिलांनी एकत्र येत स्वामी चरित्राचे पारायण केले.

याशिवाय कांगोणी फाटा, घोडेगाव, मुकुंदपूर, लांडेवाडी आणि नेवासे फाटा परिसरातील विविध आश्रम व संस्थांमध्ये मिरवणूक, पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन करून गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

 

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 0 1 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे