Breaking
ई-पेपरगणेश उत्सव नेवासातहसीलदार नेवासानेवासा तालुकानेवासा प्रेस क्लबपोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगवकृत्व स्पर्धाविशेष निवड

मंडळांच्या उत्साहाला सामाजिक जबाबदारीची जोड!

नेवासा पोलिसांचा ‘आदर्श गणेशोत्सव गौरव’ उपक्रम; डीजेमुक्त, व्यसनमुक्त आणि पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन

0 7 2 5 0 4

 

मंडळांच्या उत्साहाला सामाजिक जबाबदारीची जोड!

 

नेवासा पोलिसांचा ‘आदर्श गणेशोत्सव गौरव’ उपक्रम; डीजेमुक्त, व्यसनमुक्त आणि पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन

 

नेवासा | प्रतिनिधी

 

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक प्रबोधनाचा उत्सव व्हावा, या उद्देशाने नेवासा पोलिस ठाणे आणि प्रेस क्लब नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ‘आदर्श गणेशोत्सव गौरव पुरस्कार’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून गणेश मंडळांना उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

 

नेवासा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

 

१०० गुणांच्या निकषांवर होणार निवड

 

आदर्श गणेश मंडळाची निवड केवळ सजावटीवर न करता विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक निकषांवर केली जाणार आहे. यासाठी एकूण १०० गुणांची गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे.

 

गणेशोत्सवाची एकूण मांडणी – ३० गुण

 

पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी – १० गुण

 

पर्यावरणपूरक सजावट – २० गुण

 

व्यसनमुक्ती व जनजागृती – २० गुण

 

शिस्त व सुरक्षितता – १० गुण

 

स्वच्छता व निर्माल्य व्यवस्थापन – १० गुण

 

 

यामुळे आकर्षक देखाव्यासोबतच सामाजिक संदेश, पर्यावरणाची काळजी आणि सार्वजनिक सुरक्षितता यांनाही महत्त्व मिळणार आहे.

डीजेमुक्त उत्सवाला प्रोत्साहन

 

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करता पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच थर्माकोलचा वापर टाळणे, पर्यावरणपूरक सजावट करणे, ऐतिहासिक किंवा विज्ञानाधारित देखावे सादर करणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि सामाजिक प्रबोधन करणे याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

 

महिला सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेलाही महत्त्व

 

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने महिला व बालकांच्या सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मंडळांनी स्वयंसेवकांची नियुक्ती करणे, सीसीटीव्ही व्यवस्था ठेवणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, आपत्कालीन वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवणे आणि परिसरात स्वच्छता राखणे, अशा बाबींचाही विचार केला जाणार आहे.

 

गणेशोत्सवातून समाजाला सकारात्मक दिशा

 

गणेशोत्सव हा आनंदाचा आणि श्रद्धेचा उत्सव असला तरी त्याला सामाजिक जबाबदारीची जोड मिळाल्यास त्याचे महत्त्व अधिक वाढते. डीजेमुक्त, व्यसनमुक्त, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध गणेशोत्सव ही आजच्या काळाची गरज आहे. नेवासा पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम मंडळांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण करण्याबरोबरच समाजाला चांगला संदेश देणारा ठरू शकतो.

 

उत्सव साजरा करूया; पण तो समाजहिताचा, पर्यावरणपूरक आणि सुरक्षितही बनवूया!

 

— नरेंद्र पाटील काळे

मुख्य संपादक, खबरनामा न्यूज डिजिटल पोर्टल

नेवासा, अहिल्यानगर

संपर्क : 9730457007

खबरनामा न्यूजचा संदेश : “शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे… सत्य आणि समाजहितासाठी परखड लेखणी!”

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 2 5 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे