Breaking
निवडणूक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीच निवडणुका दिवाळीपूर्वी घेण्यात येतील, असे संकेत दिले आहेत.

निवडणुकीची लवकरच रणधुमाळी महाराष्ट्रात

0 2 6 4 9 2

 

 

नेवासा ( प्रतिनिधी“)विधानसभेचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपणार आहे. अशा वेळी सरकार मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणार की मुदत संपल्यावर एक महिना उशिरा निवडणूक घेणार, यावर मतमतांतरे होती. परंतू आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीच निवडणुका दिवाळीपूर्वी घेण्यात येतील, असे संकेत दिले आहेत.

 

गेल्या वेळी म्हणजे २०१९ मध्ये, अधि सूचना २७ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती आणि २१ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. तर २४ ऑक्टोबर रोजी निकाल घोषित करण्यात आला होता. यावेळीही साधारण २५-३० सप्टेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. तसेच कदाचित निवडणूक एकाच टप्प्यात होईल.

 

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही १२ नोव्हेंबरच्या आसपास राज्यात विधानसभा निवडणूक होईल, असे सूतोवाच केलं आहे. परंतू २९ ऑगस्टला गुप्तचर विभागातल्या सुत्रांच्या हवाल्याने दोन टप्प्यात निवडणूक होणार असल्याचं वृत्त आहे.

 

१२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान निवडणूक होणार असल्याचे समजते. २०१९ मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली होती. ती एकाच टप्प्यात झालेली होती.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. त्यांच्याकडून राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरु होतील.

 

राज्यात मागील अनेक वर्ष एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. पण सध्या राज्यात आंदोलनांचा जोर वाढलेला असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. २००४ पासून राज्यात विधानसभेच्या चार निवडणुका झाल्या. चारही वेळा एकाच टप्प्यात मतदान झालं होतं.

 

सामान्य जनतेचा आता येईल सगळ्या�

“गेल्या चार वर्षांच्या कालखंडात वेगवेगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नसंदर्भात ‘काडीनं औषध लावायचं’ काम करत होते. सामान्य जनतेच्या सुखदुःखांचे कोणालाच काहीही देणं घेणं नव्हतं. पण आता निवडणुकीचे ढोल वाजायला लागले, की सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अंगात येईल. सर्वसामान्य जनतेला या सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड पुळका येईल.

 

सुज्ञ मतदारांनो, मतलबी आणि लबाडांपासून सावधान…!

 

काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन दिशाभूल करतील. अनेक प्रलोभने दाखवतील. मात्र सूज्ञ मतदारांनी अशा मतलबी आणि लबाड नेते तसेच कार्यकर्त्यांपासून सावधान राहण्याची खरी गरज आहे

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 4 9 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे