केंद्रीय कृषी मूल्य आयोग समवेत शेतकरी आत्महत्या संदर्भात विचार मंथन
राहुरी कृषी विद्यापीठ. भारत सरकारचे कृषी मूल्य आयोग डॉ.विजयपाल शर्मा यांच्या समवेत शिर्डीचे लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

केंद्रीय कृषी मूल्य आयोग समवेत शेतकरी आत्महत्या संदर्भात विचार मंथन
राहुरी ( प्रतिनिधी)राहुरी कृषी विद्यापीठ. भारत सरकारचे कृषी मूल्य आयोग डॉ.विजयपाल शर्मा यांच्या समवेत शिर्डीचे लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे, कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे ऋषभ तलवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अनुषंगाने सखोल विचार मंथन केले आज महाराष्ट्रात सरासरी दररोज नऊ ते दहा शेतकरी आत्महत्या दुर्दैवाने होत आहेत यासंदर्भात कारण मीमांसा व उपाय योजना करणे आवश्यक असल्याची प्रतिपादन अडवोकेट अजित काळे यांनी केंद्रीय कृषी मूल्य आयोग समोर प्रतिपादित केले विशेषतः किमान मूलभूत किंमत एम एस पी याला कायदेशीर संरक्षण देणे आवश्यक असल्याचे मत मांडले प्राप्त स्थितीत शेतीमालाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला असून त्या प्रमाणात किमान आधारभूत किंमत शेतमालाची वाढविली पाहिजे डॉक्टर डॉक्टर अशोकराव ढगे यांनी शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे अशी निवेदन सविस्तर आयोगाला सादर केले डॉक्टर शर्मा यांनी महाराष्ट्रातील शेतमालाच्या खरेदी विक्री संदर्भात आधुनिक व्यवस्थापन पद्धती अंगीकारणे काळाची गरज आहे असे स्पष्ट केले याप्रसंगी प्रगतशील शेतकरी पवार यांनी चर्चेत भाग घेतला आमच्या प्रतिनिधी बोलताना त्यांनी माहिती दिली