जुने अभिलेखे जतन करण्याची तात्काळ कार्यवाही करा* दिपक पाचपुते यांची मागणी
जिल्ह्यातील महत्वाची कागदपत्रे गहाळ होत असून त्याची जबाबदारी निश्चित असलेल्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठांकडून कोणतीही दखल होत नाही,

*जुने अभिलेखे जतन करण्याची तात्काळ कार्यवाही करा* दिपक पाचपुते यांची मागणी
प्रतिनिधी अहिल्यानगर :
जिल्ह्यातील महत्वाची कागदपत्रे गहाळ होत असून त्याची जबाबदारी निश्चित असलेल्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठांकडून कोणतीही दखल होत नाही,यामुळे नागरिकांसह प्रशासनाला विविध अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे जिर्ण अवस्था झालेले दस्तऐवज स्कॅन करून ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असून
त्यानुसार आता जिर्ण अवस्थेतील दस्तऐवज स्कॅनिंगने सुरक्षीत ठेवणार असल्याने नागरिकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील जिर्ण अवस्थेतील दस्तऐवज हळूहळू गहाळ होत आहेत. दस्तऐवज गहाळ झाल्यास संबंधित नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जीर्ण अवस्थेतील दस्तऐवज स्कॅन करून जतन ठेवण्याची मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी प्रशासनाकडे केली असून.
अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाची कागदपत्रे गहाळ होत असून त्याची जबाबदारी निश्चित असलेल्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठांकडून कोणती ही दखल होत नाही, यामुळे अशा कारणास्तव प्रशासकीय पारदर्शक कारभारासाठी अडथळा निर्माण होत आहे, त्या अनुषंगाने आपण आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जुन्या महत्वाच्या महसूली अभिलेखाचे स्कॅनिंग करून शासन निर्णय, परिपत्रका प्रमाणे महत्वाचे अभिलेखे जतन करण्याबाबत आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्यात यावीत. दरम्यान, यामुळे जिर्ण अवस्थेतील दस्तऐवज देखील सुरक्षीत राहणार आहेत.तसेच शासकिय अभिलेख गहाळ झाल्यास शासकिय कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होतो .त्यामुळे दिपक पाचपुते यांनी योग्य मागणी केलेली आहे . तरी यांच्या मागणीची दखल घेवुन शासनाने सर्व कार्यालयाने लवकरात लवकर आदेश दयावे .