*”मी शेवगावकरचा” दणका अहिल्यानगरच्या एल सी बी च्या दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकार्यांनी मोडला गांजा सप्लाय करणारांचा मणका*
!! मध्यप्रदेशातुन शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे गांजा व्रिकीसाठी आणणारे 2 आरोपी जेरबंद आरोपी कडून 29 लाख 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई !!!*

*”मी शेवगावकरचा” दणका अहिल्यानगरच्या एल सी बी च्या दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकार्यांनी मोडला गांजा सप्लाय करणारांचा मणका*
*!!! मध्यप्रदेशातुन शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे गांजा व्रिकीसाठी आणणारे 2 आरोपी जेरबंद आरोपी कडून 29 लाख 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई !!!*
*{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755*
तालुका प्रतिनिधी शेवगांव दिनांक 08/ 03 / 2025 शनिवार ~
या बाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारा मार्फत शेवगाव पोलीस हद्दीतील हातगाव शिवारातील बाबासाहेब धनाजी बडे व अनिल बाबासाहेब बडे यांनी अंमली पदार्थ मोठया प्रमाणात दोन कारमधुन विक्रीसाठी आणुन तो त्यांचे घराशेजारील जनावराचे गोठयामधील खोलीमध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना दिल्याने पथकाने संयुक्तिक कारवाई करून 29 लाख 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीं ताब्यात घेऊन शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
*ताजा कलम*
शहरात रोडच्या कडेला सरकारी जागेत राजरोस साठा आणि विक्री करणारे आणि तालुक्यात काही ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून धरण पट्ट्यात राजरोस उत्पादन करणारे बरेच मोठे स्टॉकिस्ट आणि सप्प्लायर आहेत एल.सी.बी. चे कर्तव्यदक्ष पि आय दिनेश आहेर आणि त्यांचे सहकारी निश्चित त्यांच्याही लवकरच मुसक्या आवळतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही
*क्रमशः*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*