Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालजिल्हाधिकारीडाँ राजेंद्र दाते पाटील मराठा आरक्षण अभ्यासक व कायदे तज्ञपोलीस स्टेशनब्रेकिंगमहाराष्ट्रमानवाधिकार सुरक्षा फेडरेशन महाराष्ट्र राज्यमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईसंभाजीनगरसंभाजीनगर उच्च न्यायालयसंभाजीनगर महानगरपालिकाहुकूमशाही

धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि स्वामी स्वरूपानंद यांचे वर तात्काळ कारवाई करा* – समस्त शिवप्रेमींची पोलीस आयुक्ता कडे तक्रार

*जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांचे उत्कृष्ठ सादरीकरण*

0 6 2 0 1 4

 

*धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि स्वामी स्वरूपानंद यांचे वर तात्काळ कारवाई करा* – समस्त शिवप्रेमींची पोलीस आयुक्ता कडे तक्रार

*जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांचे उत्कृष्ठ सादरीकरण*

*प्रतिनिधी*दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या ऐतिहासिक विपर्यास, मानहानी कारक व भावना दुखावणारे वक्तव्याबद्दल भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ व इतर कायद्या अन्वये त्यांचेवर आणि स्वामी स्वरूपानंद यांचे वर कायदेशीर कारवाई बाबत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना सकल मराठा समाज आणि समस्त शिवप्रेमीच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली.
प्रा.डॉ.शिवानंद भानुसे यांनी निवेदन आणि तक्रारी बाबत जन आक्रोश कसा तीव्र झाला आहे हे नमुद केला.
या तक्रारी बाबत सादरीकरण करतांना अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी सविस्तर पणे नमुद केले की, छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषां विषयी धीरेंद्र शास्त्री ( बागेश्वर धाम ), स्वामी स्वरूपानंद व सर्व वाचाळ विरांवर यांचेवर छत्रपती शिवाजीमहाराज व सर्व महापुरुषां विषयी धीरेंद्र शास्त्री ( बागेश्वर धाम ),स्वामी स्वरूपानंद व सर्व वाचाळ विरांवर ऐतिहासिक विपर्यास, मानहानीकारक व भावना दुखावणारे वक्तव्याबद्दल भारतीय न्याय संहिता(बी एन एस) २०२३ व इतर कायद्या अन्वये कारवाई करण्यासाठी आमची ही तक्रार आहे.
पुढे त्यांनी तक्रारी बाबत मांडणी करतांना नमुद केले की,मागील काही दिवसांपासून महापुरुषां च्या विरोधात केलेल्या विकृत विधानामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदरील धीरेंद्र शास्त्री असोत किंवा इतर वाचाळवीर असोत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रा मध्ये वंदनीय असलेले सर्व महापुरुष यांच्या विरुद्ध केलेल्या विधानामुळे समस्त समाजात आणि जन सामान्यात अत्यंत रागाचे व चिड आणणारे वातावरण निर्माण झालेले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व धर्मीय,सर्व जातीय,सर्व पक्षीय,सर्व सामाजिक संघटना व सर्व शिवप्रेमी यांच्या वतीने अशी तक्रार करण्यात येते की,दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी नागपूर नगरीत सार्वजनिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खालील विधान केले: ” शिवाजी महाराज अनेक लढाया लढून थकले होते… त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या पायाशी मुकुट ठेवला आणि म्हणाले ‘मी थकलो आहे, आपण राज्य सांभाळावे’… “सदर विधान हे पूर्णतः असत्य, काल्पनिक आणि इतिहासाचा विपर्यास करणारे आहे तसेच वास्तवीक ऐतिहासिक व कायदेशीर आक्षेप असा आहे की,छत्रपती शिवाजी महाराज कधीही “थकले” नव्हते. त्यांनी स्वराज्याची निर्मिती रयतेसाठी केली आणि ते अखेरपर्यंत सक्रिय होते. त्यांना थकलेले दाखवणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान असुन या वक्तव्यामुळे भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ च्या द्वेष पसरवणे,धार्मिक भावना दुखावणे आणि महापुरुषांची मानहानी करणे व या अन्वये व इतर वक्तव्य हे गंभीर गुन्हे असुन त्याच प्रमाणे धीरेंद्र शास्त्री, स्वामी स्वरूपानंद तसेच इतर वाचाळवीर यांच्यावर कठोर कारवाई करून यांना महाराष्ट्रा मध्ये कुठलाही प्रवचन व इतर मार्गाने जाहीर कार्यक्रम घेण्याची परवानगी देऊ नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

*वक्ताव्या वरील सामग्री हटवणे:*

यु ट्यूब व सोशल मीडियावरील सदर भाषणाचे आक्षेपार्ह व्हिडिओ व संबधित पोस्ट तात्काळ हटवण्यात यावेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व पक्षीय, सर्व सामाजिक संघटना व सर्व शिवप्रेमी यांच्या वतीने अशी विनंती व तक्रार करण्यात येते की,धीरेंद्र शास्त्री,स्वामी स्वरूपानंद तसेच इतर वाचाळ वीर यांच्यावर बी एन एस व इतर लागु होणाऱ्या कायद्या प्रमाणे त्यांचेवर राष्ट्रद्रोह व नमुद कायद्या प्रमाणे व इतर अस्तित्वात असलेल्या कायद्या प्रमाणे कठोर कारवाई करून यांना महाराष्ट्रामध्ये कुठलाही कार्यक्रम घेण्याची परवानगी देऊ नये. शासनाने व प्रशासनाने सदरील तक्रारीचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्रभर सर्व धर्मीय, सर्व जातीय,सर्वपक्षीय, सामाजिक संघटनासह व सर्व शिवप्रेमी व्यापक स्वरूपात मोठे जन आंदोलन करण्याच्या मनस्थितीत असुन होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासनाची व प्रशासनाची असेल.
करीता सदरच्या तक्रारी प्रमाणे गुन्हा नोंद होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही तक्रार स्वीकारावी ही नम्र विनंती करण्यात आली असता पोलीस आयुक्त यांनी उपस्थित मान्यवरांना आश्वासित करतांना नमुद केले की,मी स्वतः नागपूर पोलीस अधिकारी यांना बोलुन तिथे काय व कसे गुन्हे दाखल केले याची माहिती संकलित करून कारवाई बाबत सध्य स्थीती ज्ञात करून घेतो आणि आपले म्हणणे शासना कडे पाठवतो.
या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपापले मत मांडले.ज्ञानेश्वर कणके यांनी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने म्हणणे ऐकून घेतल्या बद्दल समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी पृथ्वीराजभाऊ पवार यांचे मार्गदर्शना खाली ही तक्रार देण्यात आली त्या वेळेस डॉ.राजेंद्र दाते पाटील, प्रा. प्रदीप साळुंके, विजय काकडे धनंजय पाटील, सुनील कोटकर सतीश वेताळ, किशोर चव्हाण,सखाराम काळे, ज्ञानेश्वर गायकवाड,प्रा. डॉ पी एम वाघ, राजीव थिटे, विष्णू चव्हाण, विधीज्ञा सुवर्णा मोहिते, हेमा पाटील,रेखा वहाटूळे, रेणुका सूर्यवंशी, कल्पना पाटील,तनश्री गायकवाड, डी एम पाटील, योगेश केवारे, मनोज गायके, मुकेश सोनवणे,सचिन मिसाळ, बाळासाहेब भगनुरे, सचिन हावळे,चंद्रकांत वराडकर,विनोद काकडे, किशोर दुबे वैभव बोडके, पंढरीनाथ काकडे,बबन गवारे अमोल पाटील, रामदास नानवटे उत्तम लोकरे, रमेश तुपे, प्रकाश कावरखे, विकास पवार या सह अनेक मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे